Oil Cans Theft | तेल डबे चोरणाऱ्या दोघांना अटक

चोरट्यांकडून १ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त; जयसिंगपूर पोलिसांची कारवाई
Oil Cans Theft  |
Oil Cans Theft | तेल डबे चोरणाऱ्या दोघांना अटक
Published on
Updated on

जयसिंगपूर : दानोळीत किराणा दुकानदारांची नजर चुकून व फसवणूक करून खाद्यतेलाचे डबे चोरी करणाऱ्या अभिषेक परशराम कोपार्डे (वय २३) आणि यश राजू मांडवकर (२३, दोघे रा. विठ्ठलनगर, भाटले मळा शहापूर, ता. हातकणंगले) यांना जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १ लाख २३ हजार २०० रुपये किमतीचे खाद्यतेलाचे १६ डबे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पुरुषोत्तम रामचंद्र कदम (रा. अंबाबाई मंदिरजवळ, माळवाडी, दानोळी, ता. शिरोळ) यांच्या राहत्या घराजवळील श्रीराम किराणा दुकानातून दोघा चोरट्यांनी खाद्यतेलाचे तीन डबे चोरून नेले होते. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी केल्यानंतर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक कोपार्डे आणि यश मांडवकर यांना ताब्यात घेतले.

दोघांचा इतर गावातही उच्छाद

या दोघा संशयितांकडे सखोल चौकशी केली असता गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी दानोळीसह रेंदाळ, माणगाव, शिवणाकवाडी, वडगाव, हातकणंगले व कबनूर परिसरातील किराणा दुकानांमधून व इतर ठिकाणांवरून नजर चुकवून एकूण १६ खाद्यतेलाचे डबे चोरी केल्याचे कबूल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news