Kolhapur News: कोडोली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सुतळी बॉम्ब उडल्याने तरुणाचा डोळा निकामी

Kolhapur News: कोडोली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सुतळी बॉम्ब उडल्याने तरुणाचा डोळा निकामी

कोडोली: पुढारी वृत्तसेवा : कोडोली (ता.पन्हाळा) येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसमोर लोखंडी नळामध्ये लावलेला सुतळी बॉम्ब उडत का नाही, हे पाहण्यासाठी तरूण गेला. यावेळी अचानक सुतळी बॉम्ब उडून डोळ्याला गंभीर दुखापत झाली. भारत संभाजी चव्हाण (वय 28, रा. देवाळे, ता. पन्हाळा) हा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला आपला डावा डोळा गमवाला लागला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. (Kolhapur News)

कोडोली येथे गुरुवारी गावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळे वेगवेगळे देखावे सादर करीत असल्याने परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोडोली गावामध्ये येतात. देवाळे येथील भारत चव्हाण हा आपल्या कुटुंबासोबत गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोडोली गावामध्ये आला होता. (Kolhapur News)

आठ वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी चौकामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसमोर आतषबाजी करण्याची पद्धत आहे. एका मंडळाचे मिरवणूक शिवाजी चौकात आली असता या मंडळांने लोखंडी पाईपमध्ये लावलेला सुतळी बॉम्ब उडत का नाही म्हणून पाहण्यास भारत चव्हाण गेला असता अचानक बॉम्ब उडल्याने त्याच्या डाव्या डोळ्याला मोठी दुखापत झाली. चव्हाण रक्तबंबाळ होऊन जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण याला यशवंत रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news