

दोनवडे, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर दोनवडे ते महादेव मंदिर बालिंगे येथे सुरक्षिततेच्या कारणावरून राष्ट्रीय महामार्ग विभागाने बॅरिकेड्स लावले आहेत. बालिंगे-दोनवडे दरम्यान अद्याप रस्त्याच्या दुतर्फा ४ फूट पाणी असून रस्त्यावर अजून पाणी आलेले नाही. वाहतूक सुरळीत सुरु आहे. सोशल मीडियावर दोनवडे-बालिंगे दरम्यान वाहतूक बंद झाल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. पण अद्याप रस्त्यावर पाणी आलेले नाही.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यावर अद्याप महापुराचे पाणी आले नसून रस्त्याखाली सुमारे ४ फूट पाण्याची पातळी खाली आहे. सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. मात्र, ती केंव्हाही बंद होऊ शकते. राधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाल्यास वाहतूक बंद होऊ शकते.
हेही वाचा