कोल्हापूर : चंदगडच्या पश्चिम भागात जोर कायम; बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गावर पाणी, वाहतूक बंद | पुढारी

कोल्हापूर : चंदगडच्या पश्चिम भागात जोर कायम; बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गावर पाणी, वाहतूक बंद

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असून आज सहाव्या दिवशीही १३ बंधारे पाण्याखाली राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन राज्यांना जोडणारा बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गावर दाटे आणि कानूर येथे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूर्व भागात आज दिवसभर पावसाचा जोर कमी होता. तब्बल ६ दिवस पाणी शेतांत तुंबून राहिल्याने नदीकाठावरील भात रोप लावणी कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असाच पाऊस आणखीन काही दिवस राहिला तर शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावरील दाटे येथे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या रस्त्यावर २ फूट पाणी असल्याने पोलीसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बॅरिकेटस लावून बंद केला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

तालुक्याच्या कानूर, उमगाव,जांभरे, गवसे, तिलारीनगर, कोदाळी, पार्ले, कळसगादे भागांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने पूर्व भागांतील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसते. आज कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पिळणी गावाचा गेल्या सहा दिवसांपासून संपर्क तुटला आहे. यल कोवाड येथे आज तिसऱ्या दिवशीही पूरस्थिती जैसे होती.

जंगमहट्टी धरणात ६४.५० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी, सावर्डे, अडकूर, तारेवाडी या घटप्रभा धरणाखालील बंधाऱ्यावर पाणी आले आहे. तसेच जांभरे प्रकल्पावरील माळी, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, कोकरे, न्हावेली आणि कोवाड बंधाऱ्यावर पाणी आले आहे.

सुंडी धबधवा, किटवाड धवधवा, बाबा धबधवा, स्वप्नवेल पॉईंट, तिलारी घाट, पारगड किल्ला, गंधर्वगड किल्ला, कलानंदिगड किल्ला, महिपाळगड किल्ला, फाटकवाडी धरण, जांबरे धरण, जंगमहट्टी धरण, सुंडी धबधबा, किटवाड धबधबा बाबा धबधबा, स्वप्नवेल पॉईंट, तिलारी घाट,पारगड किल्ला, गंधर्वगड किल्ला, कलानंदिगड किल्ला, महिपाळगड किल्ला, फाटकवाडी धरण, जांबरे धरण, जंगमहट्टी धरण ही पर्यंटन स्थळे होणा-या अतिवृष्टीमुळे पर्यटकांसाठी व स्थानिक लोकांना प्रतिबंधित करण्यात आल्याने ओस पडली होती.

पिळणी, भोगोली, हिंडगाव, सावर्डे अडकूर, कोनेवाडी – करंजगाव, हेरे चंदगड बंधा-यावर पाणी आल्याने या मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

Back to top button