Flood Impact | कोल्हापुरातील तीन रस्ते खुले; महापुराला उतार

नागरिकांना दिलासा : पावसाचा जोर कमी
Kolhapur Floods
कोल्हापुरातील तीन रस्ते खुलेPUDHARI
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगेच्या महापुराचा शहरासह परिसराला पडलेला विळखा रविवारपासून सैल होऊ लागला. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, धरणातील विसर्गही कमी होत गेला. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून वाढत चाललेली पंचगंगेची पातळी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून कमी होऊ लागली आहे.

Kolhapur Floods
Nashik News | कृषी माल आयात-निर्यातीला सरकारचे पाठबळ

यामुळे पुरालाही उतार सुरू झाला असून, पूरग्रस्त नागरिकांसह शहरालाही दिलासा मिळाला आहे. शहरातील तीन रस्ते पाणी ओसरल्याने वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. पंचगंगेची पातळी शनिवारी रात्री ९ वाजता ४७.८ फुटांवर गेली. यानंतर रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आठ तास पातळी स्थिर राहिली.

सकाळी सहा वाजल्यापासून पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता पाणी पातळी ४७.७ फूट झाली. ती कमी होण्यास सुरुवात झाली. दिवसभरात ८ इंचांनी पाणी पातळीत घट झाली. रात्री ९ वाजेपर्यंत पातळी ४७ फुटांपर्यंत खाली आली होती. पाणी पातळी कमी होत चालल्याने पुराचा विळखाही सैल होत चालला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात व्हीनस कॉर्नर येथे आलेले पाणी वेगाने ओसरत आहे. यामुळे व्हीनस कॉर्नर-दसरा चौक मार्ग दुपारनंतर खुला झाला. शाहूपुरी सहाव्या गल्लीत आलेले पाणीही मागे सरकले, यामुळे या गल्लीतील वाहतूक सुरू झाली. स्टेशन रोड जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर (असेम्ब्ली रोड) आलेले पाणीही ओसरले, यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

जयंती नाल्यावरील पाणी पातळी कमी होत चालली आहे. सोमवारी हा मार्गही खुला होईल, अशी शक्यता आहे. शनिवारी पंचगंगा तालमीपुढे गेलेले पाणी आज रात्री पुन्हा तालमीसमोर आले. शहरात रविवारी रात्री उशिरा व्हीनस कॉर्नर-कोंडा ओळ मार्गासह शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणी होते. बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत, लक्षतीर्थ वसाहत आदीसह पुराचे पाणी शिरलेल्या परिसरात वाढलेल्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.

Kolhapur Floods
व्हेनेझुएलात सत्तांतर नाहीच!, राष्‍ट्राध्‍यक्षपदी पुन्‍हा निकोलस मादुरो
  • 'राधानगरी'चे दोन दरवाजे अद्याप खुलेच

  • पंचगंगेची पातळी ४७ फुटांपर्यंत खाली

  • व्हीनस कॉर्नरचे पाणी ओसरायला सुरू

  • असेम्ब्ली रोडवरचे पाणीही ओसरले

  • जयंती नाल्यावरील पूल आज वाहतुकीस खुला होण्याची शक्यता

  • कोल्हापूर-गांधीनगर मार्गावर एकेरी वाहतूक

शहर, करवीर तालुक्यातील शाळा

महाविद्यालयांना आजही सुट्टी शिरोळमधील नऊ शाळाही राहणार बंद कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पूर कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी अनेक रस्ते बंद असल्याने सोमवारी (दि. २९) कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी रात्री काढले. शिरोळ तालुक्यातील नऊ शाळांत निवारा केंद्रे सुरू केल्याने या शाळांनाही सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news