Assault Case | हुपरीतील आरटीआय कार्यकर्ता हल्लाप्रकरणी तिघांना अटक

पैशाच्या देवघेवीतून सुपारी घेऊन हल्ला; सुपारी देणारा सांगलीचा अमृत सावंत पसार
Assault Case
हुपरी : हल्ल्यातील संशयितांसोबत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी व पथक.
Published on
Updated on

हुपरी : येथील आरटीआय कायकर्ते अशोक बाजीराव खाडे (वय ६१, रा. अंबाईनगर, हुपरी) यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. सुपारी घेऊन हा हल्ला करणार्‍या कोल्हापुरातील तिघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने आवळल्या. या हल्ल्याची सुपारी देणारा सांगलीचा अमृत सावंत मात्र पसार आहे.

जयकुमार भारत ढंग (वय २८, मूळ रा. शास्त्रीनगर, सध्या रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), अभिजित बाळासो पाटील (३४, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), फिरोज ऊर्फ साजिद अल्लाबक्ष शेख (२५, रा. सरनाईक वसाहत, जवाहरनगर, कोल्हापूर) या तिघा हल्लेखोरांवर स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटकेची कारवाई केली. या तिघांनी सुपारी घेऊन हल्ला केल्याची कबुली दिली आह़े.

आरटीआय कार्यकर्ते खाडे हे (दि. ६) सप्टेंबर रोजी सायंकाळी फिरत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या उजव्या खांद्यावर व दोन्ही पायांवर लाडकी दांडक्याने जोरदार मारहाण केली होती. तसेच, अश्लील शिवीगाळ केली होती. यात खाडे गंभीर जखमी झाले होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेवरून पो.नि. सुशांत चव्हाण व पो.नि. सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या घटनेचा सखोल तपास करून हल्लेखोरांची ओळख पटवली. याप्रकरणी जयकुमार ढंग, अभिजित पाटील व फिरोज ऊर्फ साजिद शेख यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सांगलीच्या अमृत सावंत व अशोक खाडे यांच्यात पैशाच्या कारणावरून वितुष्ट आल्याने सावंत याच्या सांगण्यावरून तिघांनी हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यावेळी अमृत सावंत हा घटनास्थळी उपस्थित होता, असेही या तिघांनी सांगितले. घटनेनंतर सावंत पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संशयित ढंग याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news