Kolhapur Flood : पूर स्थितीमुळे कोल्हापूर-गारगोटी मार्ग कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता

रस्त्यावर एक ते दोन फुट पाणी
Kolhapur Flood
कूर : येथे गारगोटी - कोल्हापुर राज्य मार्गावर रस्त्यावर आलेले पाणी Pudhari Photo
Published on
Updated on

कोनवडे, राम देसाई

मागील चार ते पाच दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. पाटगाव धरण क्षेत्रात मुसळधार पडणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि.25) पाच वाजता कोल्हापूर - गारगोटी मार्गावर कूर येथे नदीवरील पुलाशेजारी एक -दोन फुट पाणी आले आहे. यामुळे प्रशासनाकडून कोणत्याही क्षणी हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्याची शक्यता आहे. सध्या पाटगाव धरण 95 % भरले असुन धरणातुन 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालु आहे.

Kolhapur Flood
Kolhapur Monsoon Update| कोल्हापूर : टाकवडे-इचलकरंजी संपर्क तुटला

चार दिवस सोसाट्याच्या पाऊस आणि वाऱ्यामुळे ऊस पिके कोलमडुन गेली आहेत. त्यामुळे नदीकाठ्याच्या पिकाबरोबर शिवारातील ऊस पिकाच्या नुकसानीने शेतकरी चिंताक्रांत आहे. तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने विद्युत तारा तुटुन विजपुरवठा खंडीत होत आहे . गेली ४८ तास कोनवडे, नाधवडे, टिक्केवाडी, कुर येथील विद्युत पुरवठा खंडीत होता.

Kolhapur Flood
कोल्हापूर : कडवी धरणातून २२९० क्यूसेस पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, नाले भरून वाहत आहेत. यामुळे निळपण आणि वाघापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. या वर्षी दुसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर गेल्याने नदी, ओढ्या शेजारील पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. कूर येथील वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर असल्याने येथील नदी शेजारी असणाऱ्या पाटील गल्लीतील घराच्या पाठीमागे पाणी आले आहे . तसेच गावच्या जॅकवेलकडे जाण्याचा मार्ग पाण्याखाली गेला आहे. नाधवडे येथील जॅकवेल पाण्याखाली गेल्याने गेली दोन दिवस गावातील पाणीपुरवठा बंद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news