Independance Day | बुबनाळ येथे ध्वजारोहणाचा मान वृत्तपत्र विक्रेत्यास

वृत्तपत्र विक्रेता नाभीराज कबाडे सन १९६२ पासून वृत्तपत्र वितरणाची सेवा करत आहेत.
Independance Day
Independance Day
Published on
Updated on

कवठेगुलंद पुढारी वृत्तसेवा

बुबनाळ ता. शिरोळ येथे महावीर पत संस्था कोथळी शाखा बुबनाळ या शाखेच्या ध्वजारोहणाचा मान वृत्तपत्र विक्रेतास देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. वृत्तपत्र विक्रेता नाभीराज कबाडे सन १९६२ पासून बुबनाळसह आलास,औरवाड, कवठेगुलंद, नरसोबावाडी, शेडशाळ, गणेशवाडी, या गावांत अगदी प्रामाणिकपणे वृत्तपत्र वितरणाची सेवा करत आहेत.

Independance Day
Independence Day : जॉन अब्राहमची दमदार वापसी तर श्रद्धा कपूरच्या अभिनयाची चर्चा

ज्यावेळी जुण्या काळात दळणवळणाची साधणे उपलब्ध नसतानाही आपण आपली सेवा अगदी चोख बजाबलात ती ही सायकल वरून पावसाळयात नृसिंहवाडी ते औरवाड पूल ज्यावेळी बंद व्हायचा त्यावेळेस नावेतून इतकेच नव्हे तर जास्त पाण्याच्या प्रवाहात ज्यावेळी नाव बंद असायची त्यावेळेस आपण सायकल वरून कागवाड मार्गे बुबनाळ पर्यंत प्रवास करून आपल्या गावच्या लोकांच्या घरोघरी वृत्तपत्र पोहचवून आपला आपल्या व्यवसायात असणारा प्रामाणिकपाणा आणि लोकांपती असणारी आस्था सिदध केल्याची व त्यांच्या प्रामाणिक कार्याची एक छोटीशी पोचपावती म्हणून महावीर ग्रामीण सह. बिगर शेती पत संस्था मर्या कोथळी शाखा बुबनाळ या संस्थेची दि. १५ ऑगष्ट रोजी चे झेंडावंदन नाभिराज कबाडे यांच्या हस्ते करणेत आला.या प्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सर्व सल्लागार मंडळ उपस्थित होते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news