कोल्हापूर : कासारवाडीच्या डोंगरात गव्यांचा कळप परतला

कोल्हापूर : कासारवाडीच्या डोंगरात गव्यांचा कळप परतला

कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : पुढारी वृत्तसेवा कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील साईबाबा मंदिराजवळील वळणालगतचा डोंगरावर सुमारे पंधरा ते वीस गव्यांचा कळप स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या निदर्शनास आला आहे. गुरुवारी (दि.२९) सकाळी कासारवाडी येथील इंद्रजीत खोत, मनोहर खोत यांच्यासह नागरिक नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले असता सादळे, कासारवाडी घाटातील साई मंदिरजवळच्या पुढच्या वळणालगत गळ्यांचा कळप वावरतानाही दर्शनाला आला.

पुढे तो मोर झरा या मार्गे डोंगरातून शियेकडे घेल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. मागील काही दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा वावर गिरोली, सादळे-मादळे, कासारवाडी डोंगर परिसरात वावरत आहेत. पावसाळा सुरू झाला तरी गळ्यांचा कळप या परिसरात ठाण मांडून बसले आहेत. सध्या पेरणीचे दिवस आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. गवे आणखीन किती दिवस या परिसरात राहणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news