Thar Kolhapur Viral Video
कोल्हापूर: एकिकडे संपूर्ण राज्यभरातील शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी मोर्चे आणि आंदोलने करत असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने आपल्या हटके प्रयोगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजरा तालुक्यातील कोरीवडे येथील प्रगतिशील शेतकरी धनाजी सयाजी देसाई यांने चक्क आपल्या महागड्या थार गाडीचा वापर भाताची मळणी करण्यासाठी केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राज्यात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. मात्र, या परिस्थितीतही काही शेतकरी आपल्या कल्पकतेने शेतीत प्रगती साधत आहेत, हे धनाजी देसाई याने सिद्ध केले आहे. देसाई याने भाताची मळणी करण्यासाठी पारंपारिक पद्धतींना फाटा देत एक अनोखा 'देसी जुगाड' वापरला. त्यांनी आपल्या दमदार महिंद्रा थार गाडीने भाताची मळणी केली.