Kolhapur News | ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर रोखले, महामार्गावरच ठिय्या मारून पोलिसांच्या दडपशाहीचा केला निषेध

बेळगाव येथे आज काळा दिवस साजरा करण्यासाठी शिवसैनिक कर्नाटकात जाण्याच्या प्रयत्नात
  Maharashtra Karnataka border dispute
कर्नाटक पोलिसांनी कागल येथील दूधगंगा नदीच्या पुलावरून पुढे जाण्यास शिवसैनिकांना बंदी घातली (Pudhari Photo)
Published on
Updated on

Maharashtra Karnataka border dispute

सिध्दनेर्ली : कर्नाटकमध्ये १ नोव्हेंबररोजी राज्योत्सव साजरा होतो, तेव्हा महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या दिवशी बेळगाव येथे काळा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी शिवसैनिक कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना कर्नाटक पोलिसांनी कागल येथील दूधगंगा नदीच्या पुलावरून पुढे जाण्यास बंदी घातली. सीमेवरती मोठ्या प्रमाणावर दोन्ही कडील पोलीस फौज फाट्यासह बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, अनेक शिवसैनिक कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना यावेळी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

आज सकाळी ९.०० ते ९.०५ वाजताच्या दरम्यान दूधगंगा नदी पुलाजवळ, महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर ठाकरे गटाचे नेते विजय देवणे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात आला. उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, प्रकाश पाटील यांच्या सह एकूण १४ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच संभाजी भोकरे यांच्यासह आणखी सहा शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  Maharashtra Karnataka border dispute
Sambhajinagar Crime : कुख्यात निशिकांत शिर्के कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्यासह कार्यकर्ते कर्नाटक हद्दीत जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना देखील अडवले. त्यांनी दूधगंगा नदीच्या पुलाजवळ हायवेवर ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. कर्नाटक तसेच कागल पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या हक्काचा उल्लेख करत कर्नाटकात जाण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले. यावेळी भारतीय नगरीत म्हणून कोणालाही कुठे ही वास्तव्य करण्याचा तसेच प्रवास करण्याचा अधिकार असताना या कर्नाटक सरकारकडून चाललेल्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी तिन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. काही काळ वातावरण तंग बनले होते. कर्नाटक सरकार विरोधात घोषणा बाजीने परिसर दुमदुमून सोडला होता. यावेळी हातात भगवे झेंडे घेऊन याठिकाणी आंदोलक कर्नाटक हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. ताब्यात घेतलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी असा दावा केला की, त्यांच्यावर दडपशाही केली जात आहे आणि कोणत्या आधारावर त्यांना कर्नाटकात प्रवेश नाकारला जात आहे, याचा खुलासा व्हावा, अशी मागणीही केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news