लाडकी बहीण योजनेला तांत्रिक अडथळ्यांची शर्यत

सर्व्हर डाऊन, सिस्टीम बंद पडणे, अ‍ॅप ओपन न होणे अशा अडचणी
Ladaki Baheen Yojana
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनाFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन, सिस्टीम बंद पडणे, अ‍ॅप ओपन न होणे आदी अडचणींना सामोरे जाताना बहिणीसह दाजीलाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Ladaki Baheen Yojana
Mazhi Ladki Bahin Yojana |'माझी लाडकी बहीण योजना': अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ; जाणून घ्या

महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत. एका कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अटी शिथिल केल्याने बहुतांश महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ही योजना महिलांना चांगलीच भावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही ई-सेवा केंद्रात रांगा लागल्या आहेत. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे कार्यकर्ते या योजनेसाठी महिलांचे फॉर्म भरून घेत आहेत. ई-सेवा केंद्र, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका अशा सर्व घटकांतून नोंदणी सुरू असल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याचे सांगण्यात येते.

Ladaki Baheen Yojana
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा पहिला 'हफ्ता' मिळणार 'या' दिवशी

सेतू केंद्रांवर रांगा लागल्या आहेत; तर अंगणवाडी सेविकांकडे महिलांची मोठी गर्दी होत आहे. विविध पक्षांनी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. तसेच व्यक्तीगत पातळीवर मोबाईलवरून अ‍ॅपद्वारे ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. त्यामुळे एकाचवेळी हजारो लोक नोंदणी करीत असल्याने तांत्रिक अडथळे येत आहेत. अधिकाधिक प्रमाणात सर्व्हर डाऊनचा फटका सहन करावा लागत आहे. अनेकवेळा तांत्रिक कारणाने यंत्रणा बिघडल्याने कागदपत्रे अपलोड होत नाहीत. एवढेच नाही तर व्यक्तिगत पातळीवर मोबाईलवर नोंदणी करतानाही अडथळे येत असून लिंक ओपन होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

‘लाडक्या बहिणी’साठी दाजीला ट्रॅफिकचा भुर्दंड

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी पती-पत्नी दोघेही धावपळ करीत आहेत. त्यामुळे जुन्या करवीर तहसीलदार कार्यालयासमोर गर्दी होत असून वाहनांची संख्याही वाढली आहे. या ठिकाणी पार्किंगची समस्या असून अनेक वाहने ट्रॅफिक पोलिसांनी उचलून नेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी दाजीला ट्रॅफिकचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याची चर्चा या कार्यालयाच्या आवारात सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news