Kolhapur Hyderabad Flight | कोल्हापूर-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाड; निम्म्या वाटेतून परत

Kolhapur Hyderabad Flight |
कोल्हापूर : हैदराबादहून परत आलेल्या विमानातील प्रवाशांची कोल्हापूर विमानतळावर तारांबळ उडाली.
Published on
Updated on

उजळाईवाडी : कोल्हापूरहून हैदराबादकडे निघालेले इंडिगो एअरलाईन्सचे विमान गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे निम्म्या वाटेतून परत आले. मात्र, खराब हवामानामुळे विमान कोल्हापूरला परत आणल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता हैदराबादच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या या विमानाचे सायंकाळी साडेसात वाजता पुन्हा कोल्हापूर विमानतळावर लँडिंग झाले. या प्रकाराने प्रवाशांचे हाल झाले.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विमान ७५ प्रवाशांना घेऊन कोल्हापूर विमानतळावरून हैदराबादकडे रवाना झाले. विमान अर्ध्या वाटेवर पोहोचल्यानंतर विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हैदराबादपेक्षा कोल्हापूर विमानतळ जवळ असल्याने विमानाला यू-टर्न घेऊन पुन्हा कोल्हापूरकडे वळविले.

दरम्यान, प्रवाशांना हैदराबाद येथे खराब हवामान आहे. यामुळे विमान परत कोल्हापूरला नेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर काही प्रवाशांना साडेआठच्या नवी मुंबईच्या विमानाने मुंबईमार्गे पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. तर काही प्रवाशांना विशेष टॅक्सीची सुविधा देण्यात आली. काहींना तिकीट रद्द करून परतावा देण्यात आला, तर काहींची कोल्हापुरात मुक्कामाची व्यवस्था करून शुक्रवारी प्रवासाची व्यवस्था केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news