राज्यस्तरीय मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुरुंदवाडचा दबदबा

राज्यस्तरीय मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुरुंदवाडचा दबदबा
Published on
Updated on

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी नगर येथे राज्यस्तरीय मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुरुंदवाडच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत ८ खेळाडूंनी १८ पदके मिळवली आहेत. यामध्ये १० सुवर्ण आणि ८ रौप्य पदक पटकावत कोल्हापूर जिल्ह्याला विजेतेपद मिळवून दिले. राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींनी कुरुंदवाड शहराचे संपूर्ण महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे.

संभाजीनगर येथे वेटलिफ्टिंग असो.च्या वतीने राज्यस्तरीय मुलींच्या युथ ज्युनियर आणि सिनियर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे : विजय जिमची ५५ किलो वजनी गटात निकिता कमलाकर (ज्युनियरमध्ये-सुवर्ण तर सिनियरमध्ये-रौप्य पदक), ५९ किलो गटात साक्षी रानमाळे (ज्युनियर, सिनियरमध्ये-सुवर्ण पदक), ६४ किलो गटात भूमिका जमदाडे (युथमध्ये ज्युनियर, सिनियरमध्ये-सुवर्ण पदक), युथमध्ये ईश्वरी पोवार (ज्युनिअर सीनियर रौप्य पदक), सई कर्णाळे (कास्य पदक) तर श्रेया गणमुखी (ज्युनिअर सिनियरमध्ये सुवर्ण पदक), हर्क्युलस जिमची युथमध्ये भूमिका मोहिते (सुवर्णपदक तर ज्युनियर, सिनियरमध्ये- रौप्यपदक ), राजनंदिनी आमने (युथमध्ये ज्युनियर-सुवर्ण तर सिनियरमध्ये रौप्य पदक) जिंकले आहे.

हर्क्युलसजिमचे प्रशिक्षक शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप पाटील यांनी कुरुंदवाडच्या खेळाडूंना वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देतात. नॅशनल इंटरनॅशनल पातळीवर खेळाडूंनी यश संपादन करून कुरुंदवाड शहराचे नावलौकिक केले आहे. यश संपादन केलेल्या खेळाडूंना प्रशिक्षक विजय टारे, उत्तम मेगने, रवी चव्हाण, प्रदीप चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news