kolhapur Crime news | कुटुंबाला छळणार्‍या मुलाचा भोसकून खून

विक्रमनगरातील अपघाताचा बनाव उधळला
kolhapur Crime news |
kolhapur Crime news | कुटुंबाला छळणार्‍या मुलाचा भोसकून खून
Published on
Updated on

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत कुटुंबात सार्‍यांनाच शिवीगाळ, मारहाण करून त्रास देणार्‍या मुलाचा जन्मदात्या बापाने धारदार चाकूने हल्ला करून काटा काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुनेद गफूर पठाण (21, रा. स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित गफूर सुलतान पठाण (45) याला मंगळवारी सायंकाळी अटक केली.

दरम्यान शिवजयंती मिरवणुकीत नृत्य करताना ट्रॉलीचा पोटाला धक्का लागून मुलाचा मृत्यू झाल्याचा संशयिताने बनाव केला. मात्र पोलिस निरीक्षक सुजित होडगर, सहायक निरीक्षक रणजित पाटील यांनी खाक्या दाखविताच खुनाचा भांडाफोड झाला.

गफूर पठाण, वृद्ध आई, पत्नी, दोन मुलांसह स्वामी समर्थ कॉलनीत राहतो. गफूरचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे; तर जुनेद भंगार विक्रीच्या दुकानात कामाला होता. जुनेद दारूच्या नशेत घरात आला की, वृद्ध आजी, आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करीत असे. सोमवारी सकाळी, सायंकाळीही त्याने वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान गफूरला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news