जवान अक्षय चौगुले अनंतात विलीन

गडहिंग्लज ः जवान अक्षय चौगुले यांना मानवंदना देताना लष्करी जवानासह पोलिस अधिकारी.
गडहिंग्लज ः जवान अक्षय चौगुले यांना मानवंदना देताना लष्करी जवानासह पोलिस अधिकारी.
Published on
Updated on

गडहिंग्लज : दिल्ली येथे मेरठ युनिटमध्ये कार्यरत असलेल्या अक्षय विलास चौगुले (रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) या जवानाचा दिल्लीमध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव खास विमानाने बेळगाव येथे आल्यानंतर कडगाव येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी गावातील तरूण मंडळांसह अन्य विविध संघटना व माजी सैनिक संघटनेने अतिशय चोखपणे नियोजन केले होते.

पार्थिव आल्यानंतर त्यांच्या घरी ठेवण्यात आले. दारामध्येच चबुतरा तयार करण्यात आला होता. याठिकाणी पार्थिव ठेवल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ, सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, जि.प. सदस्य अनिरुद्ध रेडेकर, शैलजा पाटील, तहसीलदार ऋषिकेत शेळके, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, पंचायत समितीच्या सदस्या सारिका बटकडली, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या ठिकाणी बेळगावहून आलेल्या सुभेदार डी. बी. पाटील, सुभेदार तानाजी पाटील यांच्या युनिटमधील लष्कराच्या जवानांनी मानवंदना दिली. यानंतर अमर रहे... अमर रहे अक्षय चौगुले अमर रहे..च्या जयघोषात पार्थिक सजवलेल्या लष्करी वाहनातून गावातून प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये गावासह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वडील विलास चौगुले यांनी पार्थिवास भडाग्नी दिला. यावेळी पत्नी स्नेहल, आई वंदना यांच्यासह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हेलावणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news