Kolhapur Fire News | कौलगे येथे शॉर्टसर्किटने गवताला आग; दहा एकर क्षेत्र जळून खाक

शेतकऱ्यांचे सुमारे लाखांचे नुकसान; तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
Fire News
Fire News(File Photo)
Published on: 
Updated on: 

Grass Fire Chandgad

चंदगड : होसूर ते कौलगे मार्गावरील कौलवाडी परिसरात बुधवारी (दि. १८) लागलेल्या आगीत कौलगे गावातील शेतकऱ्यांचे सुमारे दहा एकर क्षेत्रावरील वाळलेले उभे गवत जळून खाक झाले. महावितरणच्या रोहित्रावरील (डीपी) शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या आगीत अर्जुन संतू पाटील, मारुती सत्याप्पा पाटील, शिवाजी संतू पाटील आणि गुजाप्पा सत्याप्पा पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या माळावरील वाळलेल्या गवताचे नुकसान झाले. यंदा नेहमीपेक्षा लवकर पावसाने उघडीप दिल्याने माळावरील गवत पूर्णपणे वाळले होते. त्यातच गवताची कापणी झाली नसल्याने आग लागल्यानंतर ती वेगाने पसरली.

Fire News
Kolhapur Leopard Attack: शिरगावात बिबट्याच्या हल्ल्यात गायीची पाडी ठार; आठवड्यात दुसरी घटना, पशुपालक धास्तावले

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे शेजारील शेतातील उभे भात आणि ऊस पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचले. अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.

दरम्यान, या आगीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.