Kolhapur Leopard Attack: शिरगावात बिबट्याच्या हल्ल्यात गायीची पाडी ठार; आठवड्यात दुसरी घटना, पशुपालक धास्तावले

शिरगाव (ता. शाहुवाडी) येथे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी पशुपालकांची झोप उडवली आहे. चिदळी परिसरात झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीच्या पाडीवर झडप घालून तिचा फडशा पाडला.
Leopard Attack
Leopard AttackFile photo
Published on: 
Updated on: 

Kolhapur Leopard Attack

विशाळगड : शिरगाव (ता. शाहुवाडी) येथे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी पशुपालकांची झोप उडवली आहे. चिदळी परिसरात झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीच्या पाडीवर झडप घालून तिचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. आठवडाभरात शेळीपाठोपाठ वासरू ठार झाल्याने परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे.

शिरगाव येथील नामदेव सखाराम पाटील यांची जनावरे चरावयास सोडली असताना बिबट्याने संधी साधत पाडीवर हल्ला केला. काही वेळाने पाडी दिसत नसल्याने शोध घेतला असता ती बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे निदर्शनास आले.

Leopard Attack
Kolhapur Accident : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दहा महिन्यांची पाडी होती. आठवडाभरापूर्वी मारुती पाटील यांची शेळीही बिबट्याने फस्त केली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच दुष्काळाच्या आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला आता पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत आहे.

बिबट्याचा वाढता वावर मानवी वस्तीसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. वनविभागाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आर्त मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Leopard Attack
Kolhapur Crime : पूर्ववैमनस्यातून निर्माण चौकात राडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.