Bus Robbery Case | खासगी ट्रॅव्हल्स दरोडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर! कसा लावला पोलिसांनी 12 तासांत छडा; वाचा सविस्तर कहाणी

Kolahpur Bus Robbery Case | कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसवर टाकण्यात आलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या दरोड्यामागे अत्यंत नियोजनबद्ध कट रचण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
Kolahpur Bus Robbery Case
Kolahpur Bus Robbery Case
Published on
Updated on
Summary
  • कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसवर दरोडा

  • ट्रॅव्हल्समधील वाहकाकडून मिळालेल्या आतल्या माहितीवर कट

  • सव्वा कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटला

  • 12 तासांत पोलिसांकडून सात आरोपी अटक

  • 1 कोटी 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसवर टाकण्यात आलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या दरोड्यामागे अत्यंत नियोजनबद्ध कट रचण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात ट्रॅव्हल्समधील वाहकानेच आतली माहिती पुरविल्याने दरोडा यशस्वी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या दरोड्याचा छडा लावत मुख्य सूत्रधारासह सात जणांना अटक केली आहे.

Kolahpur Bus Robbery Case
Goa News | बॉडी कॅमेरे बंधनकारक करणारे गोवा देशातील पहिले राज्य

कोल्हापूर येथील न्यू अंगडिया सर्व्हिस कंपनीकडून सराफ व्यावसायिकांची मौल्यवान पार्सल नियमितपणे अशोका ट्रॅव्हल्सच्या बसमधून मुंबई येथे पाठवली जात होती. या बसमधून ने-आण होणाऱ्या सोन्या-चांदीच्या ऐवजाची संपूर्ण माहिती ट्रॅव्हल्सचा वाहक सैफू बशीर अफगाणी याला होती. ही माहिती त्याने आपल्या सख्ख्या भावाला, जैद बशीर अफगाणी याला दिली. याच टप्प्यावर दरोड्याचा कट रचला गेला.

जैद अफगाणीने ही माहिती टोळीचा म्होरक्या अक्षय बाबासाहेब कदम याला दिली. त्यानंतर अक्षय कदमने कोल्हापूर आणि सांगली परिसरातील आपल्या विश्वासू साथीदारांना एकत्र करून दरोड्याचा सविस्तर आराखडा तयार केला. विक्रमनगर परिसरात झालेल्या बैठकीत दरोड्याची अंमलबजावणी कशी करायची, कोण प्रवासी म्हणून बसमध्ये चढणार आणि कोण दुचाकीवरून बसचा पाठलाग करणार, याचे नियोजन करण्यात आले.

सोमवारी रात्री तावडे हॉटेलजवळ ट्रॅव्हल्स थांबताच अक्षय कदम, जैद अफगाणी आणि आणखी एक साथीदार प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. बस किणी टोल नाका ओलांडून वाठारच्या दिशेने जात असताना रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अक्षय कदमने बॅगमधून धारदार कोयता काढला. वाहक सैफू अफगाणीच्या गळ्याला कोयता लावल्याचे भासवून चालकाला धमकी देण्यात आली.

काही प्रवाशांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण....

बस थांबताच काही प्रवाशांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी सर्व प्रवाशांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर चालक व वाहकाकडून बसची डिकी उघडून पोत्यामधील चांदीच्या विटा व तयार सोन्याचे दागिने आरोपींनी ताब्यात घेतले. काही मिनिटांतच दरोडा उरकून आरोपी दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाले.

घटनेनंतर चालकाने वाठार येथे पोहोचताच वडगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. महामार्गावर बस अडवून दरोडा टाकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

Kolahpur Bus Robbery Case
Goa December Tourism | डिसेंबरमध्ये गोव्यात अनुभवण्यासाठी 5 हटके गोष्टी

12 तासांत सूत्रधार अक्षय कदमसह सात जणांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वडगाव पोलिसांनी तावडे हॉटेल ते किणी टोल नाका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

दरम्यान, बस वाहक सैफू अफगाणीच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. चौकशीत त्याने अखेर संपूर्ण कटाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत सूत्रधार अक्षय कदमसह सात जणांना अटक केली.

अक्षय कदमच्या विक्रमनगर येथील घरावर छापा टाकून 60 किलो चांदी, सोन्याचे दागिने व इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपींची चैनीची जीवनशैली व आर्थिक अडचणी हे या गुन्ह्यामागील कारण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news