

शिरोली एमआयडीसी : शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील विलास नगर परिसरात मंगळवारी रात्री पुर्व वैमनस्यातून दांपत्यासह मुलावरही ऐडक्यासारख्या घातक हत्याराने हल्ला करणाऱ्या चौघांची गुरूवारी सायंकाळी धिंड काढण्यात आली. या चार आरोपींना वडगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्याना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेदिवशी चौघांनीही हातात धारदार एडके हातात घेवून दहशतवाद माजवत कांबळे कुटुंबावर प्राण घातक हल्ला केला होता.
पुलाची शिरोली येथील विलास नगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवन करून शतपावली करण्यासाठी गेलेल्या कांबळे दांपत्यावर वैभव राजू बेडेकर (वय 25 रा लालबहादूर हौसिंग सोसायटी, माळवाडी शिरोली पुलाची ता.हातकणंगले ), आर्यन अनिल शिंदे ( वय 18 ), साहिल अरुण बनगे ( वय 22 ), साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक (वय 21 रा. सावंत कॉलनी, माळवाडी, शिरोली पुलाची ता. हातकणंगले ) या चौघांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात दिगंबर याच्या डोक्यास , हातावर वार केल्याने त्याची बोटे तुटली होती. तर त्याची पत्नी आरती कांबळे ही जखमी झाली होती तर मुलगा वल्लभ या हल्ल्यातून बचावला होता.
या हल्ला नंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन झाले होते. शिरोली पोलिसांनी बुधवारी कागल येथे त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आज गुरुवारी वडगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची सोमवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी या चार हल्लेखोर आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले व चौकशी करत त्यांनी ज्या परीसरात हातात ऐडके घेऊन दहशत निर्माण केली व कांबळे दांपत्यावर खुनी हल्ला चढवला त्याच परिसरात त्यांच्या हाताला दोरी बांधून फिरवत धिंड काढली. या वेळी रस्त्यावर या परीसरातील आबाल वृध्द नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.
या चौघांनी ज्या परिसरात या दांपत्यावर हल्ला केला त्या घटनास्थळावरून व गावातून त्यांची धिंड काढण्यात आली. शिरोली गावातून गुन्हेगारी प्रवृतीच्या आरोपींची दुसर्यांदा धिंड काढण्यात आली पहिली म्हणजे स्मशानात आघोरी पुजा करणाऱ्या मांत्रिक व व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्याची तर गुरुवारी या चौघांची धिंड निघाल्याने पोलिसांनी अशाच प्रकारे गुन्हेगारी रोखण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.
गणेश विसर्जन मिरवणूक 3 सप्टेंबरला पार पडली होती. त्यावेळी झालेल्या वाद डोक्यात ठेवून पूर्व वैमनस्यातून दिगंबर कांबळे यांचेवर एडक्याने हल्ला करून व पत्नीला मारहाण करून मंगळवारी रात्री ९.०० चे सुमारास फरार झालेल्या चौघांना अटक केली.त्यांची शिरोली पोलिसांनी गावातून धिंड काढली.
3 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीतील रागातून वैभव राजू बेडेकर( वय २४ लालबहादूर हाऊसिंग)) साहिल अरुण बनगे( वय २२ रा. लाल बहादूर हाउसिंग ) साहिल चंद्रकांत शिद्रुक (वय २१ रा.सावंत कॉलनी ) चौथा आरोपी आर्यन अनिल शिंदे वय (१८ रा. लाल बहादूर हाउसिंग सोसायटी)यांनी आपल्या हातात एडकेने दिगंबरच्या कांबळे यांचेवर एडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले तर मारामारी वेळी पत्नी आरती मध्ये पडली तिलाही मारहाण केली.
त्यानंतर संशयित चार चाकी गाडीतून फरार झाले होते. शिरोली पोलिसांनी चौघांना बुधवारी सायंकाळी ७.०० वाजता कागल येथून ताब्यात घेतले होते.त्यांची आज शिरोली पोलिसांनी गावातून धिंड काढली. ज्या हद्दीत मारामारी घटना घडली त्या ठिकाणी व गावातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढली.ती पाहण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती.