Shirdhon Gram Panchayat corruption: शिरढोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांचे तातडीच्या चौकशीचे आदेश

...चौकशी अहवालाच्या आधारे दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून रक्कम वसूल करण्याची मागणी
Shirdhon Gram Panchayat corruption: शिरढोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांचे तातडीच्या चौकशीचे आदेश
Published on
Updated on

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमधील पंधरावा वित्त आयोग निधी, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली तसेच विविध विकासकामांच्या खर्चातील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सातगोंडा उर्फ पोपटराव पुजारी व शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेऊन संबंधित चौकशी अहवाल सादर करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

Shirdhon Gram Panchayat corruption: शिरढोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांचे तातडीच्या चौकशीचे आदेश
Shirdhon Gram Panchayat corruption: शिरढोण ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी ठप्प; तक्रारदारही गप्प!

यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यानुसार ४ जून व २२ जून २०२६ रोजीचे चौकशी अहवाल सादर करण्यात आले असून, त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात गंभीर अनियमितता, नियमबाह्य खर्च व कथित आर्थिक घोटाळा झाल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

Shirdhon Gram Panchayat corruption: शिरढोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांचे तातडीच्या चौकशीचे आदेश
Shirdhon Gram Panchayat News | शिरढोण ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न?

या अहवालांची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री गोरे यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पुजारी यांनी दिली. दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाची रक्कम वसूल करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी उपस्थिती विश्वास बालीघाटे अविनाश पाटील सुरेश सासणे सुकुमार पुजारी विजय सूर्यवंशी रोहन हेरवाडे पप्पू कूगे उपस्थित होते. या प्रकरणामुळे शिरढोण ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Shirdhon Gram Panchayat corruption: शिरढोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांचे तातडीच्या चौकशीचे आदेश
Gram Panchayat elections: ग्रामपंचायत मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित; प्रारूप यादी प्रसिद्धीला ऐनवेळी ब्रेक

"या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शासनाने कारवाई टाळल्यास शिष्टमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

– सातगोंडा उर्फ पोपटराव पुजारी, जिल्हाध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news