Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ‌’साठी चंदगडला स्थळ पाहणी गतीने

इसापूर, म्हाळुंगे येथे शेतकऱ्यांशी संवाद ः प्रांत, तहसीलदार, वन अधिकारी यांची उपस्थिती
Shaktipeeth Highway
इसापूर : येथे माहिती घेत असताना आ. शिवाजी पाटील. शेजारी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, राजश्री पचंडी, अमेय सबनीस, रवींद्र बांदिवडेकर आदी.
Published on
Updated on

चंदगड ः शक्तिपीठ महामार्ग कामाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात जमीन संपादित होणाऱ्या गावांमधून शेतकऱ्यांशी संवाद साधत स्थळ पाहणीला वेग आला आहे. इसापूर व म्हाळुंगे या दोन गावांमध्ये आ. शिवाजी पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी पाहणी केली.

चंदगड तालुक्यातले शक्तिपीठ मार्गातील शेवटचे गाव इसापूर येथे स्थळ पाहणी केली. या ठिकाणी सात गटांमधील जमीन संपादित होणार आहे. तर वन खात्याची ही जमीन संपादित करावी लागणार आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. या ठिकाणी प्रभारी नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार, हेरे मंडल अधिकारी राजश्री पचंडी, चंदगड मंडल अधिकारी संतोष पाटील, चंदगडचे वनपाल कृष्णा डेळेकर, पाटणेच्या वनक्षेत्रपाल शीतल पाटील, भूमी अभिलेखचे तालुका निरीक्षक महेश कुंभार, जलसंपदा विभागाचे अभियंता ए. बी. धोंडफोडे व अधिकारी उपस्थित होते. यानंतर सोमवारी म्हाळुंगे येथे आ. शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, चंदगडचे नगरसेवक अमेय सबनीस, स्थानिक शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीला शेतकऱ्यांची संख्या मोठी होती, असेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news