शाहूवाडी : तालुका क्रीडांगण १९ वर्षे रखडले; निधीची कमतरता, क्रीडा कौशल्‍य विकासाचा लोकप्रतिनिधींना विसर

शाहूवाडी तालुका क्रीडांगण
शाहूवाडी तालुका क्रीडांगण
Published on
Updated on

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा अगोदर जागेच्या वादात, नंतर उद्धाटनाच्या श्रेयवादात आणि आता निधीची कमतरता अशा अनेक कारणांमुळे बांबवडे येथील तालुका क्रिडांगण तब्बल १९ वर्षानंतरही अपूर्णच आहे. सध्या या मैदानात खेळा ऐवजी गुरेढोरे चरतानाचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.

१९९९ साली तत्कालीन राज्यशासनाने ग्रामिण खेळाडूंना पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात त्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, क्रिडाकौशल्य विकसित व्हावे आणि एकंदर खेळांना चालना मिळावी त्या विचारातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रिडागण ही संकल्पना पुढे आली.

दरम्यान, तालुका क्रीडांगणासाठी शाहूवाडी येथे जागा उपलब्ध नसल्याने मलकापूर येथे हालचाली झाल्या. परंतू येथेही जागा उपलब्ध नसल्याने तत्कालीन समितीच्या शिफारशीनुसार बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पश्चिमेला उपलब्ध जागेत क्रीडांगण उभारण्याचे निश्चित झाले. २००४ साली तत्कालीन आमदार श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड यांच्या पुढाकाराने या क्रीडांगणाच्या पहिल्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध झाला.

दरम्यान २००४ च्या विधानसभा निवडणूकीत शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा सदस्य म्हणून सत्यजीत पाटील-सरूडकर यांची निवड झाली आणि जागेच्या वादात विलंब झालेले क्रीडांगणाचे काम पुढे जाऊन उद्घाटनावरून श्रेयवादात थांबले. तोडगा म्हणून माजी आमदार गायकवाड व तत्कालीन आ. सरुडकर यांनी संयुक्तपणे उद्घाटन करून क्रीडांगणाचे काम सुरू करण्यात आले.

क्रिडांगणास अनेकदा मंजूर झालेल्या त्या निधीतून मैदानाचे संरक्षक कठडे, धावण्याचा ट्रॅक, बास्केटबॉल मैदान व अन्य किरकोळ कामे करण्यात आली. मात्र, आजअखेर १९ वर्षानंतरही मैदानाचे उर्वरित काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

आमदार म्हणून संजीवनीदेवी गायकवाड (सन २०००), सत्यजीत पाटील (२००४ आणि २०१४), विनय कोरे (२००९ आणि २०१९) यांनी आलटून पालटून प्रतिनिधित्व केले. मात्र, युवकांच्या दृष्टीने महत्वाचे क्रिडांगण पूर्णत्वाला गेलेले नाही. साहजिकच आजघडीला कोट्यावधी रुपये खर्च वाया गेल्याची परिस्थिती आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावी रखडलेल्या या मैदानाच्या जागेत खेळाऐवजी सद्या गुरेढोरे चरत आहेत.

क्रिडांगणाबाबत बदलते शासकीय धोरण

तालुका क्रिडांगणासाठी २००४ साली २५ लाख निधीची तरतुद होती. २०१६ ला त्यात बदल होऊन १ कोटी करण्यात आली. पुन्हा २०१९ साली धोरण बदल होऊन ५ कोटी तरतूद करण्यात आली. शासनाच्या या बदलत्या धोरणामुळे क्रिडांगणाच्या कामास विलंब होत गेला आहे.

बांबवडे येथील मैदानाचे काम अपूर्णावस्थेत आहे. हे खरेच आहे. उर्वरित आवश्यक कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. क्रीडांगणासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल. पुढील आवश्यक काम गतीने करण्याचा प्रयत्न करू.

चंद्रशेखर साखरे ( जिल्हा क्रिडा अधिकारी )

'सध्या शासनाच्या क्रिडा व युवक कल्याण विभागाकडे आमदार विनय कोरे यांच्या मार्फत ३ कोटी ६५ लाखाच्या निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. अनुदान प्राप्ती नंतर कुस्ती संकुल व्यायामशाळा, कार्यालयीन इमारत, हॉस्टेल, स्वच्छतागृहे या सुविधा करण्यात येणार आहेत.'

—- सचिन चव्हाण (तालुका क्रिडा अधिकारी )

'शासनाला खेळाडूंकडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा विविध पदकाची अपेक्षा असते. मग अशाप्रकारे उदासीनतेच्या गर्तेत क्रिडांगण अडकले आणि सुविधा मिळणार नसतील तर पदक मिळविणारे खेळाडू कसे घडतील.'
पै. विजय बोरगे (जि.प. सदस्य)

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news