Kolhapur Crime : शाहूवाडी सरपंच खूनप्रकरणी पारदर्शी तपासाची मागणी

नातेवाईकांची भूमिकाही तपासा; मृत न्यारे यांच्या कुटुंबाची मागणी
Kolhapur Crime News
शाहूवाडी सरपंच खूनप्रकरणी पारदर्शी तपासाची मागणी
Published on
Updated on

कोल्हापूर : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) खून प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे होऊन सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन बुधवारी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना दिले. यामध्ये दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले.

उसने घेतलेले ८ तोळे दागिने आणि ३ लाखांची रोकड परत मागितल्याने न्यारे यांचा खून केल्याचा आरोप त्यांच्या कुटंबीयांनी केला. या प्रकरणी प्रकाश पाटील, त्याची पत्नी मंगल पाटील, मुलगा शिवाजी पाटील आणि या प्रकरणात मदत करणारा प्रकाश पाटील याचा भाचा संदेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळात साहिल न्यारे, जनार्दन न्यारे, संग्राम पाटील, बाळासो पाटील, तानाजी गुजर, यशवंत जाईंगडे, बाबाजी पाटील, लक्ष्मण पाटील, महादेव पाटील आदींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news