Satyajit Patil | आमदार, खासदारांना दुष्काळाबाबत खंत वाटत नाही : सत्यजित पाटील-सरूडकर

शाहूवाडी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मागणी, तहसील कार्यालयावर धडक मोर्चा 
Shahuwadi Tahsildar Office Morcha
माजी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार शुभांगी जाधव यांना निवेदन दिलेPudhari
Published on: 
Updated on: 

Declare Shahuwadi Drought Affected

सरूड : शाहूवाडी तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळला गेला तरी याची विद्यमान आमदार आणि खासदारांना कसलीही खंत नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याची जळजळीत टीका करून माजी आ.सत्यजित पाटील-सरूडकर यांनी आ.विनय कोरे, खा.धैर्यशील माने यांना लक्ष्य केले.

शाहूवाडी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.२८) शाहूवाडी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासमोर बोलताना माजी आ.सत्यजित पाटील यांनी नमोल्लेख टाळून आ. कोरे आणि खा. माने यांच्यावर दोषारोप केला. माजी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार शुभांगी जाधव यांना निवेदन सादर केले.

Shahuwadi Tahsildar Office Morcha
Kolhapur Ganeshotsav | मिरवणुकीत ध्वनी मर्यादा धाब्यावर; पापाची तिकटीजवळ सर्वाधिक १०१.९ डेसिबल आवाज

माजी आ. पाटील म्हणाले, दुष्काळग्रस्त यादीबाबतची पूर्वसूचना संबंधित लोकप्रतिनिधींना दिली जाते. त्यावेळी या भागाचे दोन्ही लोकप्रतिनिधी कुठे होते? त्याचवेळी शाहूवाडी विधानसभेचे आमदार आणि लोकसभेचे खासदार यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असते तर आज शाहूवाडी तालुका सरकारच्या दुष्काळग्रस्त यादीत दिसला असता. अन्यायाच्या विरोधात लोकप्रतिनीधींना जाब विचारण्याचा हक्क नागरिकांना आहे. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही तर तो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काढल्याचे पाटील यांनी आवर्जून स्पष्ट केले.

ग्रामीण जिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी मोर्चाबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट करताना, शाहूवाडी तालुक्यात पावसाने गेल्या महिनाभरापासून पूर्ण उघडीप दिली असल्यामुळे पाण्या अभावी भात, नाचणी, रताळी, भुईमूग, सोयाबीन आदी पिके वाळून धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत. जिरायती आणि बागायती क्षेत्रात एकसारखी दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली असताना केवळ सरकार दरबारी योग्य पाठपुराव्या अभावी शाहूवाडी तालुक्याचा दुष्काळग्रस्त जाहीर यादीत समावेश झालेला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांवर एकप्रकारे हा अन्यायच झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि जनरेट्याद्वारे तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच हा मोर्चा आयोजित केल्याचे सांगितले.

Shahuwadi Tahsildar Office Morcha
kolhapur | प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ

यावेळी मोर्चात उपजिल्हाप्रमुख बाबासो पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अलका भालेकर, तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, पूनम भोसले, रामचंद्र कोकाटे, योगेश कुलकर्णी यांच्यासहा शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख व शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news