

गुडाळ : राधानगरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील वृद्ध मतदार आणि 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अशा एकूण 616 मतदारांनी होम वोटिंग करत मतदानाचा हक्क बजावला. राधानगरी विधानसभा मतदार संघात राधानगरी आणि भुदरगड हे दोन पूर्ण तालुके आणि आजरा तालुक्यातील एका जि. प. मतदार संघाचा समावेश आहे.
या मतदारसंघात 554 वयोवृद्ध आणि 92 दिव्यांग अशा एकूण 646 मतदारांनी होम वोटिंग साठी 12 ड फॉर्मद्वारा नोंदणी केली होती. त्यापैकी 532 वयोवृद्ध आणि 84 दिव्यांग अशा 616 मतदारांनी होम वोटिंग केले. राधानगरी 272 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हरीश सूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही तालुक्यात ही मतदान नोंदणी प्रक्रिया पार पडल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांनी दिली.