

म्हाकवे, पुढारी वॄतसेवा : म्हाकवे (ता.कागल) येथील सरपंचपदी राजे समरजितसिंह घाटगे गटाच्या कविता दयानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रदीप कोरवी यांनी काम पाहिले.
ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अडीच वर्षापूर्वी झाली आहे. युतीच्या फॉर्मुल्यानुसार संजय घाटगे गटाच्या सुनिता चौगुले यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते. या विशेष सभेला मावळत्या सरपंच सुनिता चौगुले, उपसरपंच रणजीत लोहार, सदस्य धनंजय पाटील, नितीन पाटील, अजित माळी, अशोक चौगुले, सदस्या आशाताई कांबळे, सविता पाटील उपस्थित होत्या.
धनाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रवींद्र पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा