कोल्हापूर : शाळांची घंटा उद्यापासून वाजणार!

कोल्हापूर : शाळांची घंटा उद्यापासून वाजणार!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  उन्हाळी सुट्टीनंतर शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची घंटा गुरुवार (दि. 15) पासून वाजणार आहे. शिक्षण विभाग व शाळांनी प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असून, विद्यार्थ्यांच्या वर्दळीने शाळा परिसर पुन्हा गजबजणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, महापालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शाळांना परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी सुरक्षिततेच्या द़ृष्टीने शालेय परिसर, वर्ग स्वच्छता, निर्जंतुकीकरण व रंगरंगोटी सुरू आहे. शाळा परिसरात रांगोळी, सजावट करून आनंददायी वातावरण तयार केले जात आहे. 13 व 14 जून रोजी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे.
पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत शंभर टक्के पटनोंदणी होण्यासाठी प्रभातफेरी, गृहभेटी, संपर्क मोहीम राबविली जाणार आहे. नवागत विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना गणवेशासह मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच गोड खाऊचे वाटपदेखील होणार आहे. विद्यार्थ्यांचे ढोल, झांजपथकाने स्वागत केले जाणार आहे. बैलगाडी व ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्याची तयारी सुरू आहे. नवागत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी शाळांना भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन देऊन त्यांचे स्वागत करणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news