Kolhapur Satej Patil warns Chandrakant Patil Gokul dairy | तुमचा काचेचा महाल मलाही माहिती आहे; मला बोलायला लावू नका !

आ. सतेज पाटील यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांना सज्जड इशारा
Satej Patil
Satej PatilFile Photo
Published on: 
Updated on: 
Summary

उद्ध्वस्त करतो, संपवतो' ही भाषा माझ्यासमोर चालणार नाही

२०२९ मध्ये जिल्ह्यातील १० मतदारसंघांपैकी कुठेही लढण्याचे खुले आव्हान

डी. वाय. पाटील यांच्यावरील वक्तव्याचा समाचार

वैचारिक पातळी घसरल्याची टीका

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 'गोकुळ' च्या सत्तासंघर्षात मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे काम तुम्ही केले आणि आता हीच लढाई अंगलट येऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनाच वादात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमचा काचेचा महाल मलाही माहिती आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका. मीसुद्धा पाटील आहे, असा थेट इशारा आमदार सतेज पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला. सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधकांना उ‌द्ध्वस्त करण्याची आणि संपविण्याची भाषा करण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणुकीला सामोरे जा. २०२९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांपैकी कुठेही एकमेकांविरोधात लढण्याची माझी तयारी आहे, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आ. सतेज पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याशी गेल्या दहा वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. मात्र, राजकारणात संघर्ष करताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून तुम्हाला उद्ध्वस्त करतो, संपवतो, अशी भाषा माझ्यासमोर चालणार नाही. ही भाषा केवळ मलाच नव्हे, तर कोल्हापूरच्या जनतेलाही आवडणार नाही. महाराष्ट्रातील जनताही अशा प्रकारची भाषा खपवून घेणार नाही. राजकीय विरोधकांना सत्तेच्या जोरावर संपविण्याची भाषा करण्यापेक्षा निवडणुका कार्यकर्त्याच्या जीवावर लढा, असे त्यांनी सुनावले.

तुमच्याकडे सत्ता आणि सरकारी यंत्रणा असेल; पण आमच्याकडे कार्यकर्त्यांचे बळ आहे. राजकीय ताकदीचा एवढाच विश्वास असेल, तर निवडणुकीच्या मैदानात या. २०२९ मध्ये जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघात लढण्याची तयारी आहे. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे निवडणुकीत स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले.

मोठे होताय, पण वैचारिक पातळी घसरतेय!

चंद्रकांत पाटील राजकीयदृष्ट्या जेवढे मोठे होत आहेत, तेवढी त्यांची वैचारिक पातळी घसरत चालली आहे. राजकीय विरोधकांवर टीका करताना व्यक्तिगत पातळीवर जाण्याची गरज नाही. स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्याबद्दल बोलून काय मिळवले? त्यांच्या योगदानाचा आणि व्यक्तिमत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. राजकीय संघर्षात अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांची नावे ओढण्याची आवश्यकता नाही. माझ्यावर टीका करायची असेल तर जरूर करा. मात्र त्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा अवमान करू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली.

२०१४ मध्ये माझ्यामुळे राष्ट्रवादीचा खासदार झाला।

२०१४ मध्ये कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून येण्यामागे माझी खासदाराने ऑक्टोबरमध्ये माझी फसवणूक केली. राजकारणात कोणासाठी काय केले आणि कोणाची भूमिका काय होती, याचा विसर पडता कामा नये. आज आमच्यावर टीका करणाऱ्यांनी पूर्वीच्या राजकीय घडामोडींचाही विचार करावा, असा टोला त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.

धुळे-मुंबईच्या बदल्यात कोल्हापूर बिनविरोध !

२०२० ते २०२२ वा कालावधीत विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याबाबत राजकीय पातळीवर चर्चा झाली होती. धुळे आणि मुंबई येथे काँग्रेसने बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्य केले होते. त्याच्या बदल्यात कोल्हापुरातील निवडणूक भाजपने बिनविरोध करावी, अशी चर्चा झाली होती. त्यावेळी झालेल्या राजकीय चर्चाचा विचार न करता आता आमच्यावर टीका केली जात आहे, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

१३ विरुद्ध १२ चे गणित बदलण्यासाठीच अध्यादेश !

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सतेज पाटील यांनी शासन नियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले होते. मात्र, शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने अध्यक्षपदाच्या निवडीचे संपूर्ण गणित बदलले. गोकुळची सत्ता मिळविण्यासाठीच राज्य सरकारने हा अध्यादेश काढल्याचा आरोप त्यांनी केला.

अध्यक्ष निवड झाली, पण न्यायालयीन लढाई कायम !

गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड झाली म्हणजे शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा आणि त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा विषय संपला, असे नाही. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहोत, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. सहकारी संस्थांमध्ये निवडून आलेल्या संचालकांचा कौल आणि लोकशाही मूल्ये महत्त्वाची आहेत. त्यामुळे शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात आमची भूमिका कायम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.