Satej Patil: सतेज पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं; म्हणाले, 'हा तर महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान'

Gopichand Padalkar: जतमधील भाषणात जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली होती.
Satej Patil
Satej PatilPudhari
Published on
Updated on

Satej Patil On Gopichand Padalkar Remarks On Jayant Patil

कोल्हापूर : जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी फटकारलं आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे.

जत येथे भाजपच्यावतीने आयोजित निषेध मोर्चावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. या विधानावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटले असून पडळकर यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून टीका होत आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पडळकर यांच्या विधानाचा समाचार घेतला.

Satej Patil
Satej Patil: विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा; सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर

सतेज पाटील म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान असून त्यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारी आहे.

भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पडळकर यांच्या विधानामुळे वाद का निर्माण झाला?

महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असली तरी टीका करताना सभ्यता पाळली जाते. मात्र, जतमधील भाषणात जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली. जयंत पाटील यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले. या विधानाचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचा सर्वपक्षीय निषेध करण्यात येत आहे. जत शहरात शुक्रवारी निघालेल्या मोर्चात तालुक्यातील सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यामध्ये माजी आमदार विक्रम सावंत यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते या निषेध मोर्चात सहभागी झाले आहेत.

Satej Patil
Satej Patil | ...तर 'गोकुळ'मध्ये टँकर कोणाचे लागणार? हे आता शेतकऱ्यांना माहीत: सतेज पाटील

जयंत पाटील काय म्हणाले?

गोपीचंद पडळकर यांच्याबाबत शुक्रवारी जयंत पाटील यांना माध्यमांनी प्रश्नदेखील विचारला. मात्र, त्यांनी पडळकरांवर बोलणं टाळलं. जयंत पाटील हे माध्यमांसमोर हात जोडून पडळकर यांच्यावर न बोलता निघून गेले.  पाटील यांनी पडळकरांवर प्रतिक्रिया देणं टाळल्याचं दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news