

Satej Patil bullock cart viral video |
कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात 'बंटी पाटील' म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण ठरले आहे त्यांनी स्वतः बैलगाडा चालवलेला क्षण...! करवीर तालुक्यातील नेर्ली येथे होणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांनी हातात कासरा पकडून आणि खांद्यावर चाबूक घेऊन बैलगाडा हाकल्याने त्यांचा एक हटके अंदाज नागरिकांना अनुभवायला मिळाला. त्यांचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
करवीर तालुक्यातील नेर्ली येथे १ जून रोजी बेंदूर सणानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक उत्साह आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या शर्यतीकडे बैलगाडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडा हाकून स्पर्धेपूर्वीचा थरार स्वतः अनुभवल्याने शर्यतीचा उत्साह आणखी वाढला आहे. पारंपरिक क्रीडा प्रकाराला चालना आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कोणतीही इजा न करता आणि नियमानुसार स्पर्धा पार पाडण्याचा संदेश त्यांनी यातून दिला आहे. त्यांचा हा बैलगाडी चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गेली पंधरा वर्षे आम्ही महापालिकेत एकत्र होतो. यावेळी मात्र, महापालिकेत सतेज पाटील यांच्या सोबत डायरेक्ट फाईट असेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील सर्व निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवणार, असल्याचे सांगत महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, महापालिकेत सतेज पाटील यांच्यासोबत 15 वर्षे तर आ. विनय कोरे यांच्यासोबत 5 वर्षे होतो. आता मात्र महापालिकेसह सर्वच निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढणार आहोत. महापालिकेला चार प्रभागांचा एक प्रभाग होणार आहे. यामुळे जो उमेदवार द्यायचा असेल तो लोकांना मान्य असणारा आणि शक्तिशाली असला पाहिजे. यासाठी सर्व्हेही केला पाहिजे. यामुळे महापालिकेत एकत्र येऊनच असे उमेदवार द्यावे लागतील. काही ठिकाणी जमलेच नाही तर महायुतीतच मैत्रीपूर्ण लढत होईल; मात्र या लढतीत महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षावर टीकाटिप्पणी केली जाणार नाही.