Sarathi Scholership NMMS exam pass Student :
महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना सारथीकडून दिली जाणारी वार्षिक शिष्यवृत्ती बंद झाल्याचा आरोप मराठा महासंघाच्या वसंतराव मुळीक यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. एमएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना वर्षाला ९ हजार ६०० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. चार वर्षांसाठी मंजूर झालेली शिष्यवृत्ती मध्येच बंद का झाली असा सवाल वसंतराव मुळीक यांनी केला.
वसंतराव मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास ७० हजार मराठा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. शिष्यवृत्ती अशी मधेच बंद करता येणार नाही. जर ती पुन्हा सुरू केली नाही तर मराठा समाजाचा हिसका दाखवून देऊ असा इशारा देखील वंसतराव मुळीक यांनी दिला.
पाहा व्हिडिओ...