संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै. ‘पुढारी’ ‘एज्यु दिशा’चे आयोजन

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै. ‘पुढारी’ ‘एज्यु दिशा’चे आयोजन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण आणि करिअरसंदर्भात भविष्याचा अचूक वेध घेणारे, भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन दै.'पुढारी'च्या वतीने करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील प्रदर्शनात करिअरच्या अगणित संधी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये विद्यार्थी-पालकांना नामवंत शिक्षण संस्थांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असून, उत्तुंग यशाचे ध्येय बाळगणार्‍या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या ध्येयप्राप्तीच्या स्वप्नांना बळ लाभणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहेत. जीवनाची दिशा ठरवणार्‍या या प्रवेशाचा निर्णय घेताना विद्यार्थी-पालकांत गोंधळाची स्थिती दरवर्षी कायम असते. अशा विद्यार्थी- पालकांसाठी दै.'पुढारी' एज्यु दिशा मागील अनेक वर्षांपासून वाटाड्याची भूमिका चोख बजावत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये करिअरविषयक अचूक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाणार आहे.

या प्रदर्शनासाठी प्रा. मोटेगावकर सरांचे 'आरसीसी' हे पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून लाभले असून, एमआयटी – एडीटी युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी हे सहयोगी प्रायोजक आहेत.

या प्रदर्शनात महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणार्‍या पर्यायांची माहिती तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरा मेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, बायो टेक्नॉलॉजी, अ‍ॅनिमेशन व व्हीएफएक्स यासह अन्य अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणार्‍या संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत.

या भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रोहित 9834433274, प्रणव 9404077990 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news