Padmashri Dr DY Patil | विंचूच्या नव्या प्रजातीला दिले होते डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव; सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टने वाहिली श्रद्धांजली

Padmashri Dr DY Patil | प्राणी मित्रांना प्रेरणा देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटीलसह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टने दिला आठवणींना उजाळा
Padmashri Dr DY Patil |
विंचूच्या नव्या प्रजातीला दिले होते डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव; सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टने वाहिली श्रद्धांजली
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत घडलेले पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षणतज्ज्ञ, मार्गदर्शक नव्हते, तर प्राणी मित्रांच्या संशोधन कार्याला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Padmashri Dr DY Patil |
विंचूच्या नव्या प्रजातीला दिले होते डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव; सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टने वाहिली श्रद्धांजली
Sangli Kolhapur Highway Accident : सांगली-कोल्हापूर महामार्ग मृत्यूचा सापळा; दीड वर्ष, १०० अपघात, ४८ मृत्यू

ट्रस्टच्या संशोधन कार्याचा पहिला निबंध नोव्हेंबर २०२४ मध्ये 'बीएनएचएस' (BNHS) या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे सापडलेल्या आयसोमेट्रस (Isometrus) वर्गातील नव्या विंचू जातीला "Isometrus dnyandeoi" (D. Y. Patil Tree Scorpion) हे नाव देऊन डॉ. डी. वाय. पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता. या वर्गातील जगभरातील ही १६ वी नोंदवलेली जात ठरली. या संशोधनाची माहिती डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत नम्रपणे घेतली होती.

Padmashri Dr DY Patil |
विंचूच्या नव्या प्रजातीला दिले होते डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव; सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टने वाहिली श्रद्धांजली
kolhapur | शहापूरमधील पिंटू रॉय कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार

'माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं नाव तुम्ही कशाला देता', असेही ते म्हणाले होते. तसेच संशोधन करणाऱ्या अभ्यासकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील संशोधन व संवर्धनाच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि भक्कम पाठिंबाही दिला होता, अशी माहिती सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट, रिसर्च अँड रेस्क्यूचे प्रमुख व मानद वन्यजीवरक्षक देवेंद्र भोसले यांनी दिली.


पट्टणकोडोलीत सापडलेल्या आयसोमेट्रस वर्गातील नव्या विंचूच्या जातीला आयसोमेट्रस ज्ञानदेव (डी. वाय. पाटील ट्री स्कॉर्पियन) नाव देऊन डॉ. डी. वाय. पाटील यांचा सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टने सन्मान केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news