kolhapur | शहापूरमधील पिंटू रॉय कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार

kolhapur |
kolhapur | शहापूरमधील पिंटू रॉय कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
Published on
Updated on

यड्राव : शहापूर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार पिंटू उपेंद्र रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शहापूर, ता. हातकणंगले) याला कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी हा आदेश दिला आहे.

पोलिस अधीक्षक यांनी रेकॉर्डवरील आणि सक्रिय गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यांनुसार हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी पिंटू रॉय याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे सादर केला होता.

रॉय याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात एकूण तीन दखलपात्र आणि तीन अदखलपात्र असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news