कोल्हापूर : पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, शिरढोण-कुरुंदवाड संपर्क तुटला

शिरढोण-कुरुंदवाड संपर्क तुटला, शिरढोण पुलावर पाणी
Rapid rise in water level of Panchganga, Shirdhon-Kurundwad communication was broken
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.File Photo
Published on
Updated on

शिरढोण : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिरढोण- कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर आज (दि.21) सकाळी पाणी आले. त्यामुळे शिरढोण-कुरुंदवाड संपर्क तुटला आहे. त्यामुळे शिरढोण ग्रामपंचायत प्रशासनाने बॅरिकेट लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तर शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

Rapid rise in water level of Panchganga, Shirdhon-Kurundwad communication was broken
उत्तराखंड : केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली, भाविक ढिगाऱ्याखाली गाडले; तिघांचा मृत्यू

दरम्यान पुराचे पाणी पुलावरून दोन फुटांनी वाहत आहे. पाण्याची वाढ संथगतीने सुरू आहे. तसेच पुराच्या पाण्याला गती असल्याने कुरुंदवाड पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बँरेकेटस लावून वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे. वाहतूक रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, तलाठी रवी कांबळे, पोलीस पाटील अनुराधा जाधव, सरपंच बाबू हेरवाडे व ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर गस्त घालत होते.

Rapid rise in water level of Panchganga, Shirdhon-Kurundwad communication was broken
Bangladesh quota protests | बांगलादेश हिंसाचार : आंदोलकांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे पोलिसांना आदेश

प्रवाशांची पोलिसांशी हुज्जत सुरू होती.मात्र पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत रस्ता बंद केला. इचलकरंजीहून कुरुंदवाडला जाण्यासाठी शिरढोण मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक असते. मात्र पुलावर पाणी आल्याने व पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा ते बारा किलोमीटर परत जावून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे काही प्रवासी स्वत:च्या जबाबदारीवर जाण्याची पोलिसांकडे परवानगी मागत पोलिसांशी हुज्जत घालत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news