कोल्हापूर : ‘राजाराम’साठी 23 एप्रिलला मतदान

राजाराम सहकारी साखर कारखाना
राजाराम सहकारी साखर कारखाना

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील लक्षवेधी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 2023-28 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. 23 एप्रिलला सात तालुक्यांतील 58 केंद्रांवर मतदान होणार आहे. 21 संचालक निवडून देण्यासाठी 13,409 ऊस उत्पादक सभासद व 129 ब वर्ग सभासद असे एकूण 13,538 सभासद मतदानाचा हक्क बजावतील.

गटनिहाय मतदार संख्या अशी : गट क्र. 1 : 1273, गट क्र. 2 : 3276, गट क्र. 3 : 2826, गट क्र. 4 : 2649, गट क्र. 5 : 1284, गट क्र. 6-: 2100, संस्था गट : 129.

कारखान्याच्या यावेळच्या निवडणुकीसाठी संचालक संख्या 2 ने वाढली असून यावेळी 21 संचालकांची निवड होणार आहे. करवीर, हातकणंगले, राधानगरी, कागल, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील 122 गावांचे कार्यक्षेत्र आहे. कार्यक्षेत्रापैकी कसबा बावडा, शिरोली पुलाची, गडमुडशिंगी, वाशी, वडणगे, मौ. टोप, शिये, धामोड, करवीर (कोल्हापूर शहर), नरंदे, कुंभोज, कांडगाव, रुकडी, निगवे दु., मौ. वडगाव, कळंबे तर्फ ठाणे, चिखली, रुई, पट्टणकोडोली या शहरासह वीस गावांमध्ये सुमारे 55 टक्के मतदान आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही आघाड्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचल्या आहेत.

निवडणुकीसाठी पूर्वी सभासदांच्या पात्र अपात्रतेपासून दोन्ही आघाड्यांकडून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अधिकच धार आली. दोन्ही आघाड्यांकडे खुल्या प्रचारासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. सरासरी 92-95 टक्के च्या दरम्यान कारखान्याच्या निवडणुकीत मतदान होते. या वेळच्या निवडणुकीत गट क्र. चार व पाच मध्ये प्रत्येकी एका संचालकाची वाढ झाली आहे. वीस गावांत 7400 च्या दरम्यान, तर 102 गावांत उर्वरित सभासद आहेत. या वेळच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड करत असताना सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांनी विचारपूर्वक उमेदवार दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news