

सरूड : चांदोली (वारणा) धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. मागील २४ तासात ७३ मि.मी. पाऊस झाला असून पाण्याची आवक ९४६१ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने मोठ्या प्रमाणात होत आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) दि. ३१ दुपारी १२:३० वाजता धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या ८ हजार ०९२ क्युसेक विसर्गात ११ हजार ५८५ क्युसेक पर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
वक्र दरवाजातून १० हजार ११५ क्युसेक व वीज गृहामधून १ हजार ४७० क्युसेक, असा वाढीव पाणीविसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा वारणा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.