

Kolhapur Radhanagari dam water level
राशिवडे : कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राधानगरी, तुळशी धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत राधानगरी धरणामध्ये १६.३७ टक्के तर तुळशी धरणामध्ये ९.३८ टक्के अतिरिक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाणीसाठा जून पर्यंत पुरविण्याचे अचूक नियोजन केले आहे.
राधानगरी, तुळशी धरणातुन जिल्ह्याला सिंचनासह पिण्यासाठी पाणीपुरठा केला जातो. आज अखेर राधानगरी धरणामध्ये ४९.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हा साठा ३२.९३ टक्के होता. तर तुळशी धरणामध्ये आज अखेर ५८.८३ टक्के साठा शिल्लक असुन गतवर्षी हा साठा ४९.५६ टक्के इतका होता. काळम्मावाडी धरणामध्ये आज अखेर २२.३३ टक्के पाणीसाठा असुन गतवर्षी २२.०२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. राधानगरी धरणामध्ये १६.३७ टक्के तर तुळशी धरणामध्ये ९.३७ टक्के अतिरिक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे अचूक नियोजन केले असून जून पर्यंत सिंचनासह पिण्यासाठी पाणी शिल्लक राहील, असे नियोजन करण्यात आले आहे.