राधानगरी: फेजीवडे, सरवडे मतदान केंद्रावर नावीन्यपूर्ण थीम

Radhanagari
Radhanagari

राधानगरी: पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या संकल्पनेतून राधानगरी तालुक्यात २ मतदान केंद्रावर थीम करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, गटाविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे यांनी दोन्ही केंद्रावर हजर राहून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

फेजीवडे (ता. राधानगरी) येथील मतदान केंद्रावर 'गवा संवर्धन' ही थीम डिजिटल फलकाद्वारे मांडण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सभामंडप उभारला असून गवा याची प्रतिकृती उभारण्यात आली असून मंडपामध्ये रेखीव भव्य रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे.

राधानगरी तालुका शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये मागील अनेक वर्षापासून राज्यात अव्वल ठरला आहे. या संदर्भातील वर्तमानपत्रातील कात्रणे, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचे पुरस्काराचे फोटो सरवडे (ता. राधानगरी) येथील मतदान केंद्रावर लावण्यात आलेली आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news