Radhanagari Dam : पावसाचा जोर कमी; राधानगरी धरणाचा ४ आणि 5 क्रमांकाचा दरवाजा बंद

सायंकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी धरणाचा क्र ४ तर ७ वाजून १० मिनिटांनी क्र ५ चा दरवाजा बंद झाला
Radhangari Dam gate no 4 And Five Closed
राधानगरी धरणाचा ४ आणि 5 क्रमांकाचा दरवाजा बंदPudhari Photo

गुडाळ : आशिष पाटील

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी कमी झाल्यामुळे आज (शनिवार) सायंकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी धरणाचा क्र 4 चा दरवाजा बंद झाला आहे. तर पाठोपाठ 7 वाजून 10 मिनीटांनी 5 क्रमांकाचा दरवाजाही बंद झाला आहे. आता स्वयंचलित दरवाज्यापैकी केवळ सहा व सात क्रमांकाचे एकूण दोन दरवाजे सुरू असून हे दोन दरवाजे आणि पॉवर हाऊस मधून एकूण 4356 एवढा विसर्ग सुरू आहे.

Radhangari Dam gate no 4 And Five Closed
Kolhapur Flood updates | कोल्हापूर : महापुराचे पाणी शहरात घुसले, नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापुरात पंचगंगेच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत असतानाच राधानगरीतून कमी होत जाणारा विसर्ग हा काहीसा दिलासादायक ठरणार आहे.

Radhangari Dam gate no 4 And Five Closed
Kolhapur Flood Update : पुणे-बेंगलाेर महामार्गावर महापुराचे पाणी समांतर

राजाराम बंधारा पाणीपातळी

राधानगरी धरणाचे चार आणि पाच क्रमांकाचे दरवाजे बंद झाल्यानंतर कोल्हापूर वासियांना दिलासा मिळाला आहे. सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 47 फूट 07 इंचावर आहे. तर पाण्याचा विसर्ग 66437 क्युसेकने सुरु आहे. तर जिल्ह्यातील एकूण 38 बंधारे पाणीखाली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news