Kolhapur Flood Update : पुणे-बेंगलाेर महामार्गावर महापुराचे पाणी समांतर

महामार्गावर कोणत्याही क्षणी पाणी येण्याची शक्यता
Kolhapur Flood Update : Chance of water coming on the highway at any moment
Kolhapur Flood Update : महामार्गावर कोणत्याही क्षणी पाणी येण्याची शक्यताPudhari Photo

शिरोली एमआयडीसी : सुनील कांबळे

पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे महापुराचे पाणी महामार्गाच्या समांतर आले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला तर कोणत्याही क्षणी महामार्गावर पाणी येऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. महामार्गावर युद्ध पातळीवर रुंदीकरण करण्यात येत असून, यामुळे वाहतुकीची काही प्रमाणात कोंडी निर्माण झाली आहे.

Kolhapur Flood Update : Chance of water coming on the highway at any moment
Kolhapur Flood updates | कोल्हापूरकरांचे टेन्शन वाढले! शहरात पाणी घुसले

महामार्गावर पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मात्र २०१९ व २०२१ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. बुधले मंगल कार्यालयासमोर सध्या रस्त्याच्या समांतर पाणी आले आहे.

Kolhapur Flood Update : Chance of water coming on the highway at any moment
Almatti Dam- Kolhapur Flood Updates | अलमट्टीतून ३ लाख क्सुसेक पाण्याचा विसर्ग

२०२१ रोजी असेच पाणी वाढत येऊन रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान महामार्गावर पाणी आले होते. त्यानंतर महापुराच्या विळख्यात महामार्ग सापडून जवळ जवळ चार दिवस महामार्ग पुर्णतः ठप्प झाला होता. महामार्गावर पाणी येऊन रस्ता बंद होईल अशा भितीने वाहनधारक आपल्या इच्छित स्थळी जाण्याची घाई करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news