Radhanagari Dam | राधानगरी धरण ८० टक्के भरले; पाणीसाठा स्वयंचलित दरवाज्याजवळ पोहोचला

भोगावती नदीपात्रात ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
 Radhanagari Dam 80 percent full
राधानगरी धरणातील पाणीसाठा स्वयंचलित दरवाज्याजवळ पोहोचला आहे.(Pudhari Photo)
Published on
Updated on
नंदू गुरव

Kolhapur Rain Radhanagari Dam 80 percent full

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच धरण 80 टक्के भरले आहे. पाणी सात स्वयंचलित दरवाज्याजवळ पोहोचले आहे. मे महिन्यातच धरणात भरपूर जलसाठा झाल्याने यंदा धरण लवकर भरले आहे.

यापूर्वी कधीही एवढ्या लवकर धरण भरल्याची नोंद नाही. धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सोमवारी (दि.७) सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये 89 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जूनपासून आजअखेर 2234 मि.मी. पाऊस झाला आहे.

 Radhanagari Dam 80 percent full
राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची संततधार ! १९ दिवसांत ५८१ मि.मी. पावसाची नोंद, धरण ५९% भरले

मे महिन्याच्या 20 तारखेला पावसाने दमदार सुरुवात केली. धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे पंचगंगा नदीतील कोल्हापुरी बंधाऱ्यातील बरगे काढण्यास अडचण निर्माण झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बरगे काढून धरणातून २५०० क्युसेक विसर्ग चालू केला. धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

पावसाचा अंदाज घेत विसर्ग वाढवला असून सध्या धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब विशेषतः सकारात्मक असून, खरीप हंगामासाठी सिंचनासाठी भरपूर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणातून जलविद्युत निर्मितीही केली जाते. त्यामुळे आगामी काळात वीज उपलब्धतेत वाढ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news