Pudhari Grand Travel Mela 2026: कोल्हापुरात 'पुढारी' आणि थॉमस कूकचा 'ग्रँड ट्रॅव्हल मेळा'

international tour offers from kolhapur: शानदार ऑफर्ससोबत करा परदेशवारीचे स्वप्न साकार
thomas cook india
Pudhari Thomas Cook Grand Travel Mela 2026Pudhari
Published on
Updated on

Pudhari thomas cook Grand Travel Mela 2026 Kolhapur

कोल्हापूर : उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांसाठी जगप्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी थॉमस कूक आणि 'पुढारी' यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात भव्य ग्रँड ट्रॅव्हल मेळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (दि. २२) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत न्यू शाहूपुरी येथील हॉटेल पर्ल (सेंट्रल बस स्टँडजवळ) येथे हा मेळावा पार पडणार आहे.

'पुढारी'च्या वाचकांसाठी विशेष सवलत

या मेळाव्यात बुकिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी थॉमस कूकने आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. 'पुढारी'च्या वाचकांसाठी ३५,००० रुपयांपर्यंतची विशेष सवलत मिळणार आहे. युरोप हॉलिडे बुक केल्यास 'क्रूझ हॉलिडे' पूर्णपणे मोफत मिळणार आहे. युरोप सहलीच्या बुकिंगवर अधिक दिवस फिरण्याची संधी मोफत मिळेल. ICICI बँकेच्या कार्डवर १५,००० रुपयांपर्यंत त्वरित सवलत मिळणार आहे. ठरावीक पॅकेजवर बाय वन गेट वन फ्री ऑफर मिळणार आहे.

travel expo Kolhapur
कोल्हापुरात 'पुढारी' आणि थॉमस कूकचा 'ग्रँड ट्रॅव्हल मेळा'pudhari photo
thomas cook india
MLA Bhimrao Keram : तालुक्यातील एकही गाव पेयजलापासून वंचित राहू नये

सुबोध भावेंची स्वित्झर्लंडमध्ये थेट भेट

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण 'स्पेशल मराठी युरोप टूर' आहे. विशेष म्हणजे, या सहलीदरम्यान पर्यटकांना लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्याशी गप्पा मारण्याची आणि संवाद साधण्याची खास संधी मिळणार आहे. ही सहल ३० मे २०२६ रोजी स्वित्झर्लंडला जाणार असून येथे सुबोध भावे यांना भेटता येईल. या सहलीची संपूर्ण माहिती या मेळाव्यात मिळणार आहे.

सुरक्षित प्रवासाची खात्री

थॉमस कूकच्या 'Trav Sure' सुविधेमुळे पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत सहल पुनर्नियोजन किंवा रद्द करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच अतिरिक्त प्रवास संरक्षण आणि २४ तास ७ दिवस ग्राहक सहाय्यदेखील उपलब्ध असेल.

कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी

केवळ बुकिंगच नाही, तर या मेळाव्यात आपल्या कुटुंबासह विविध मजेदार खेळ खेळण्याची आणि बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे. युरोप सहलीची सुरुवात प्रतिव्यक्ती १.७ लाख रुपयांपासून होत आहे.

thomas cook india
Congress dharna protest : काँग्रेसचे सोमवारी धरणे आंदोलन

मेळाव्याची वैशिष्ट्ये

  • देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे

    या मेळाव्यामध्ये केवळ युरोपच नव्हे, तर जगभरातील विविध ठिकाणांच्या सहलींची सविस्तर माहिती आणि नियोजन सांगण्यात येणार आहे.

  • लोकप्रिय आंतरराष्ट्रीय सहली

    जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि डिस्नी अॅडव्हेंचर क्रूझ

  • सुलभ व्हिसा सहली

    दुबई-अबुधाबी, सिंगापूर-मलेशिया, थायलंड, मॉरिशस, बाली आणि व्हिएतनाम

  • आध्यात्मिक यात्रा

    कैलास मानसरोवर, हेलिकॉप्टरसह चारधाम यात्रा, रामायण ट्रेल, नेपाळ (मुक्तिनाथ) आणि काशी-अयोध्या

  • भारतीय सहली

    आसाम-मेघालय, केरळ, हिमाचल, अंदमान, काश्मीर, भूतान आणि श्रीलंका

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि आपले नाव नोंदवण्यासाठी 8691076421 या क्रमांकावर संपर्क साधा. प्रवेशासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScmbDK1GAamXhhlIAVhTagoHHM7HBu-1kXKBGfIguNOFaF9LQ/viewform?pli=1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news