

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्याला हवं तसं घर मिळावं, याचा शोध प्रत्येकालाच असतो. कोल्हापूरकरांचा हा शोध 'पुढारी' ग्रुपच्या वतीने आयोजित 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023' या प्रॉपर्टीविषयक प्रदर्शनात संपणार आहे. शनिवार, दि. 18 मार्च रोजी या तीन दिवसीय बांधकामविषयक प्रदर्शनाचा शुभारंभ होणार आहे.
आयकॉन स्टील हे या एक्स्पोचे मुख्य प्रायोजक आहेत. या प्रदर्शनात स्वप्नातील घर शोधण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार असून एकाच छताखाली कोल्हापुरातील घर खरेदीचे असंख्य पर्याय उपलब्ध होणार आहेत.
हे प्रदर्शन 18, 19 आणि 20 मार्च 2023 असे तीन दिवस चालणार आहे. मधुसुदन हॉल, असेंब्ली रोड, शाहूपुरी, कोल्हापूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात निवासी तसेच व्यापारी (कमर्शियल) प्रॉपर्टीचे प्रवर्तक, बांधकाम व्यावसायिक, विकासक, तसेच गृहकर्ज पुरवठादार बँका आणि इतर वित्तीय संस्था एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने घर बुक करण्याची इच्छा असलेल्यांना एक चांगली संधी या एक्स्पोने दिली आहे. तसेच या ठिकाणीच त्यांना गृहकर्जाचे विविध पर्याय तसेच, घरासाठी आवश्यक असणारी अन्य उत्पादनेही उपलब्ध होणार आहेत.
प्रॉपर्टी खरेदीदारांसाठी 'पुढारी' प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील, आपआपल्या गरजांनुसार वेगवेगळ्या आकारांच्या, निवासी आणि व्यापारी प्रॉपर्टीज एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो' हा मेगा इव्हेंट म्हणजे खरेदीदारांसाठी तर एक सुुवर्णसंधीच असणार आहे. बांधकाम व्यावसायिक, विकासक, प्रवर्तक आणि खरेदीदारांच्या गरजांचा विचार करून या एक्स्पोची आखणी करण्यात आली आहे.
बांधकाम क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023' ही मोठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळेच या प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगला बांधकाम व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी होणार्या या एक्स्पोला मोठ्या संख्येने कोल्हापूर आणि आजुबाजूच्या जिल्ह्यातील ग्राहक भेट देतात. त्यामुळेच आपला ब—ँड ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची तसेच व्यवसायवृद्धीची संधी म्हणून 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो'ला बांधकाम क्षेत्रातून पसंती दिली जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क आनंद खोत – 9850991186