कोल्हापूर जिल्ह्यात ‘पुढारी न्यूज’चे जोरदार स्वागत; शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर जिल्ह्यात ‘पुढारी न्यूज’चे जोरदार स्वागत; शुभेच्छांचा वर्षाव
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पत्रकारितेचा मापदंड ठरलेल्या दै. 'पुढारी'चे 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनल मंगळवारी थाटात सुरू झाले. 'पुढारी न्यूज'चे कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वच भागांत जल्लोषी स्वागत करण्यात आले. जिलेबी, साखर-पेढे वाटप, आतषबाजी करत अनेकांनी आनंद साजरा केला. 'आमचे चॅनल सुरू झाले, यापेक्षा आणखी मोठा आनंद काय?', सर्वसामान्यांचा आधारस्तंभ; आता महाराष्ट्रात आवाज उठवणार,' अशा भावना, विविध शुभेच्छा फलकांद्वारे अनेकांनी व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणप्रश्नी खंबीरपणे पाठीशी राहणार्‍या दै. 'पुढारी'च्या 'पुढारी न्यूज'चे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी 'आवाज जनतेचा, पुढारी न्यूजचा' अशा घोषणा देत साखर-पेढे वाटप करण्यात आले. यावेळी बाबा इंदुलकर, अमर निंबाळकर, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, जाफर मुजावर, संभाजी रणदिवे, मामा ओतारी, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

सरकारी-निमसरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटप करण्यात आले. यावेळी समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, प्रकाश पाटील, विठ्ठल वेलणकर, नंदकुमार इंगवले, सतीश ढेकळे, नितीन कांबळे, रमेश पाटील, संदीप कांबळे, अजय पंडत, महेश सावंत, विमल चव्हाण, रश्मी चौगुले, कमलेश कोरडे, महेश कांबळे, सुवर्णा डवरी, योगेश जंगम, लक्ष्मण पवार, देवेंद्र भोसले, सरिता माने, मनोज काजवे, राज महिंद्रकर, संदीप पवार, कुमार धबधबे, करिम तडवी, तानाजी शिंदे, विजय पवार, भारत शिरगावकर, अनिल टेकाळे, युवराज इंगवले, मनीषा कोरवी, भक्ती भस्मे आदी उपस्थित होते.

शाहू मिल चौकात समर्थ कृपा फेडरेशन, शाश्वत प्रतिष्ठान, जिल्हा रेशनधान्य दुकानदार संघटना आदींच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात, साखर-पेढे वाटप करत, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे, गजानन हवालदार, प्रशांत अवघडे, अनिल कवाळे, आदिनाथ साठे, रणजित औदकर, राहुल सोनटक्के, शमुवेल गर्दे, सचिन घाडगे, दाविद भोरे, शेखर कवाळे, राजेंद्र गोते, भालचंद्र सावंत आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीने पेढे वाटप करत आनंद व्यक्त करण्यात आला. सतीशचंद्र कांबळे, महादेव देवाडिगा, रिजवान मुल्लानी, जमीर गवंडी, रहिम पठाण, बबलूशेठ परीख, अजहर मोमीन, इम्रान मोगल, गोरख थोरात, भाऊ अवघडे, उमर उचगावकर, रणजित पाटील, अमोल पवार, सिद्धार्थ कांबळे, राजू पठाण, दिलदार मुजावर, रियाज शेख, इर्शाद फरास, सोहेल मुजावर,उत्कर्ष पवार, मधुकर माने, राहुल मुदगल, आरिफ शेख, विकास गायकवाड, विशाल चौगुले, गणेश बुचडे, गौरव कुसाळे, अरुण चौगुले, अमोल पाटोळे, रितेश पाटील, मुसा पठाण, बबलू कवठेकर, किरण साठे, सतीश माने, युवराज कवाळे आदी उपस्थित होते.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फेरीवाले संघटनेच्या वतीने साखर-पेढे वाटप करण्यात आले. यावेळी कॉ. रघुनाथ कांबळे, अशोक कांबळे, मोहन छत्रिय, दस्तगीर पाटणकर, सुरेश धमाने, प्रवीण शिंदे, विकास गायकवाड, शिवाजी माळी, विठ्ठल भोगटे, पंकज महापुरे, रघुनाथ मांडवकर, समीर मोमीन, सादिक मुलानी, रमेश पवार, आकाश बोरडेकर, धनाजी कवाळे, राहुल गावडे, रणधीर महापुरे, राहुल बाळगोंडा आदी उपस्थित होते.

शिवालय शिवसेना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्व पदाधिकार्‍यांनी एकत्रित बसून 'पुढारी न्यूज' पाहण्याचा आनंद लुटला. यावेळी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ युवासेना प्रमुख ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह किशोर घाटगे, उदय घोरपडे, सुभाष भोसले, ओंकार परभणे, आकाश सांगावकर, रोहन शिंदे, प्रवीण पाटील, विजय क्षीरसागर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पाचगाव परिसरातील योगेश्वरी कॉलनी येथे नागरिकांनी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते लखन काझी, रवींद्र चव्हाण जयदीप सर्वदे, महादेव पाटील, आदित्य शिंदे, मयूर गुरव आदींसह नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news