

कोल्हापूर : ‘पुढारी’ माध्यम समूह, शहाजी लॉ कॉलेज व खंडपीठ कृती समितीच्या वतीने वकिलांसाठी शनिवारी (दि.16) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शहाजी लॉ कॉलेजच्या ऑडीटोरीयममध्ये सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.
‘उच्च न्यायालयाच्या नव्या बेंचसमोरील आव्हाने आणि अडचणी : एक द़ृष्टिकोन’ व ‘लॉ ऑफ रिट पिटीशन’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. सतीश तळेकर व अॅड. प्रल्हाद परांजपे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनीताई मगदूम राहणार आहेत. या कार्यशाळेला वकील, विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.