kolhapur | दै. ‘पुढारी’ कस्‍तुरी क्‍लब, राजाकाका आणि केक व्हिला आयोजित ‘पेस्ट्री क्वीन’

kolhapur |
kolhapur | दै. ‘पुढारी’ कस्‍तुरी क्‍लब, राजाकाका आणि केक व्हिला आयोजित ‘पेस्ट्री क्वीन’
Published on
Updated on

कोल्‍हापूर : केक बनवण्याची आवड आहे; पण त्‍याला प्रोफेशनल टच कसा द्यायचा, असा प्रश्न पडतो? मग, ही संधी तुमच्यासाठीच आहे. दै. 'पुढारी' कस्‍तुरी क्‍लब, राजाकाका इलेक्ट्रॉनिक्स आणि केक व्हिला यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 'पेस्‍ट्री क्वीन' ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. मंगळवारी (दि. ७) ही कार्यशाळा राजाकाका मॉल, लक्ष्मीपुरी येथे होणार आहे. कस्‍तुरी क्‍लबच्‍या १९ व्‍या वर्धापनदिनानिमित्त या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळा दोन सत्रांत आयोजित करण्यात आली असून, पहिले सत्र दुपारी १२ ते ४ आणि दुसरे सत्र दुपारी ४ ते सायं. ६ या वेळेत होईल. केवळ २०० रुपयांच्‍या प्रवेश शुल्‍कात महिलांना कौशल्यासह गोड अनुभवांची पर्वणी लाभणार आहे. कार्यशाळेत स्‍पाँज केक, केक डेकोरेशन, डॉल जेल केक, रोझ केक, ब्लॅक फॉरेस्ट, मिरर केक तसेच मायक्रोवेव्ह ओव्हनची माहिती आणि त्यामध्ये तयार होणाऱ्या विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. त्याचे प्रशिक्षण कस्तुरीच्या प्रशिक्षिका उज्ज्वला भोसले देणार आहेत.

कार्यक्रमाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे 'राजाकाका मॉल'मधील खास लकी ड्रॉ घेण्यात येणार असून विजेत्यांना हँड मिक्‍सर, हेअर ड्रायर, इस्‍त्री अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये महिलांनी गुलाबी किंवा पोपटी रंगाचा ड्रेस किंवा साडी परिधान केलेल्या महिलांना सहभागी होता येणार आहे. तसेच, शॉपमधील सर्वाधिक आवडलेल्या वस्तूबाबतचे उत्तर देणाऱ्या महिलांमधून भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुक महिलांनी तातडीने नावनोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ९९२३४९९७११, ९१४६४८८१८३ व ९१७५६१३००२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

विश्वास, गुणवत्ता आणि आधुनिकतेचा संगम - राजाकाका स्‍टोअर

लक्ष्मीपुरी येथील राजाकाका प्रीमियर स्‍टोअर ग्राहकांना जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी उपकरणे एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे आधुनिक शोरूम आहे. श्रीमती सोनी केशवानी आणि अश्विन केशवानी यांच्या नेतृत्वात या स्टोअरमध्ये एलईडी व स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर्स, किचन अप्लायन्सेस, स्मार्ट गॅजेटस्‌‌ तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँडस्‌ची उत्पादने उपलब्ध आहेत. तज्ज्ञ मार्गदर्शन, घरपोच वितरण, अधिकृत इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची सेवा, सोपे फायनान्स, एक्स्चेंज ऑफर्स आणि कॉर्पोरेट सप्लायसारख्या सुविधांमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करत अल्पावधीतच कोल्हापूरमधील विश्वासार्ह प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स शोरूम म्हणून स्टोअरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सेलिब्रेशनचा खरा आनंद... ‘केक व्हिला’सोबत

२०११ मध्ये स्थापन झालेले ‘केक व्हिला’ गेल्या १५ वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाची आणि गुणवत्तेची ओळख बनले आहे. केक व्हिलाच्या संस्थापिका रजनीगंधा रावसाहेब वंदुरे असून एक महिला हा व्यवसाय सांभाळत आहे, हे कौतुकास्पद आहे. प्युअर व्हेज केकसाठी केक व्हिला प्रसिद्ध आहे. येथे रसमलाई, रबडी, ब्लॅक फॉरेस्ट, हनी रोज केक, केशर-बदाम, केशर-पिस्ता असे खास व्हरायटीचे केक बनवले जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार फौंडंट केकही बनवून दिले जातात. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, नामकरण, बेबी शॉवर किंवा कोणताही आनंदाचा क्षण... प्रत्येक सेलिब्रेशन अधिक खास बनवण्यासाठी केक व्हिला सज्ज आहे. या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी कॅफे उपलब्ध असून पिझ्झा, बर्गर, कॉफी असे विविध पदार्थ येथे मिळतात. १०० टक्के फ्रेश केक्स, विविध आकर्षक फ्लेवर्स, आवडीनुसार थीम व कस्टमाईज्ड केक्स आणि बर्थडे डेकोरेशनचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरी, रंकाळा टॉवर तसेच मुक्त सैनिक वसाहत येथील शाखांना भेट देत प्रत्‍येक गोड क्षण अधिक संस्‍मरणीय करता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news