Pudhari Festival : ‘पुढारी’ दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये तुडुंब गर्दी

खरेदीच्या पर्वणीचे उरले दोनच दिवस!
Pudhari Festival : ‘पुढारी’ दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये तुडुंब गर्दी
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर दैनिक ‘पुढारी’ आयोजित आणि ‘इन्व्हेड ॲग्रो लि.’ प्रायोजित बहुचर्चित ‘दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये रविवारी सुट्टीचा दिवस साधत कोल्हापूरकरांनी तुफान गर्दी केली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली असून, प्रदर्शनाचे शेवटचे दोनच दिवस उरल्याने ग्राहकांनी आपल्या आवडत्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आणि विविध ब्रँडस्‌च्या घसघशीत सवलतींचा लाभ घेण्यासाठी अक्षरशः एकच गर्दी केली आहे.

दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर लागलेले हे प्रदर्शन नागरिकांसाठी पर्वणी ठरत आहे. एकाच छताखाली कपडे, गृहोपयोगी वस्तू, दिवाळीचा फराळ, खाद्यपदार्थ आणि अत्याधुनिक वाहनांची रेलचेल असल्याने नागरिक सहकुटुंब खरेदीचा आनंद घेत आहेत.

ऑटोमोबाईल विभागात वाहनप्रेमींची तुफान गर्दी

यंदाच्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये ऑटोमोबाईल विभाग संपूर्ण प्रदर्शनाचे मुख्य केंद्रबिंदू ठरला असून, वाहनप्रेमींनी येथे विशेष गर्दी केली आहे. दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन घरी नेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी नामांकित कंपन्यांनी स्पॉट बुकिंगवर भरघोस सवलती आणि आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. दुचाकी सेगमेंटमध्ये मोफत इन्शुरन्स, कमी डाऊन पेमेंट आणि प्रत्येक बुकिंगवर स्मार्टवॉच यांसारख्या गिफ्टस्‌मुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे. चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) दालनात तर अक्षरशः झुंबड उडाली असून, पॉवरफुल इलेक्ट्रिक गाड्या आणि विविध ईव्ही मॉडेल्सवर मिळणाऱ्या लाखांपर्यंतच्या सवलतींमुळे ग्राहकांच्या पसंतीस ही वाहने उतरत आहेत. एकाच छताखाली शेकडो मॉडेल्सची तुलना करण्याची आणि एकाच दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळत असल्याने वाहन खरेदीदारांसाठी हा फेस्टिव्हल पर्वणी ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news