Financial Planning : ‘पुढारी‌’ आणि आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडच्या वतीने कोल्हापुरात गुंतवणूक चर्चासत्र

'आर्थिक साक्षरता‌’ या विषयावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन
Financial Planning Workshop
‌‘पुढारी‌’ आणि आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडच्या वतीने कोल्हापुरात गुंतवणूक चर्चासत्र
Published on
Updated on

कोल्हापूर : बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान बळकट होत असताना सर्वसामान्यांसाठी आर्थिक साक्षरता आणि योग्य गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे. गुंतवणूकदारांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या संपत्तीत वृद्धी करण्यासाठी दैनिक ‌‘पुढारी‌’ आणि आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड (ABSLAMC) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. 17 जानेवारी रोजी रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे दुपारी 4.30 ते सायंकाळी 7 या वेळेत हे चर्चासत्र होणार आहे. ‌‘म्युच्युअल फंड, आणि आर्थिक साक्षरता‌’ या विषयावर आधारित या कार्यक्रमात तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाईल.

सध्या बाजारपेठेत गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत; मात्र आपल्या उद्दिष्टांनुसार योग्य पर्यायाची निवड कशी करावी, याबद्दल अनेक गुंतवणूकदारांच्या मनात संभम असतो. हाच संभम दूर करून, शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे (SIP) आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल, हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे. या चर्चासत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे झोनल स्पीकर अभिजित देशमाने उपस्थित राहणार आहेत. ते म्युच्युअल फंड आणि आर्थिक नियोजनातील बारकाव्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.

‌‘या‌’ विषयावर मिळणार माहिती

  • म्युच्युअल फंडातून महागाईवर मात : वाढती महागाई आणि भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे महत्त्व. तसेच, बदलत्या काळात संपत्ती निर्मितीसाठी आधुनिक गुंतवणुकीचे तंत्र.

  • पारंपरिक पर्यायांच्या पलीकडे गुंतवणूक : बँक एफडी आणि विमा यांसारख्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांच्या पलीकडे जाऊन, अधिक परतावा देणाऱ्या आधुनिक आर्थिक पर्यायांची सखोल माहिती.

नाव नोंदणी आवश्यक

हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे; मात्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी आणि आर्थिक नियोजनाचा पाया मजबूत करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दैनिक ‌‘पुढारी‌’ आणि ABSLAMC तर्फे करण्यात आले आहे.

संपर्क ः अमर 9545327545

स्थळ ः रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर

शनिवार, दि. 17 जानेवारी 2026

दुपारी 4.30 ते सायंकाळी 7 पर्यंत

नाव नोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा

Pudhari

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news